Maharashtra

पर्यावरण मित्र संघटना,भारत संस्थेच्या वतीने शाखा कर्नाटक राज्य येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

पर्यावरण मित्र संघटना,भारत संस्थेच्या वतीने शाखा कर्नाटक राज्य येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात 

पर्यावरण मित्र संघटना,भारत संस्थेच्या वतीने शाखा कर्नाटक राज्य येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

       पर्यावरण मित्र संघटना,भारत संस्थेच्या शाखा कर्नाटक राज्य संघटक व सामाजिक कार्यकर्ते श्री.सचिन लोकरे व पर्यावरण मित्र संघटना कर्नाटक राज्य टिम च्या वतीने सलग ८ दिवस  कर्नाटक राज्यातील पूरग्रस्त ठिकाणी जेवणाची सोय तसेच साहित्य वाटप करण्यात आले.
       अतिवृष्टी मुळे महाराष्ट्र राज्यातील सांगली , सातारा , कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यासोबतच कर्नाटक राज्यातही भयंकर पूरस्थिती निर्माण झाली असल्याने कित्येक कुटुंब पाण्याखाली गेली तसेच बऱ्याच प्रमाणावर मानहानी झाली आहे. 
यां नैसर्गिक आपत्तीच्या जाळ्यात अडकलेल्या पूरग्रस्तांसाठी मदतीची आवश्यकता भासत आहे.
 यां परिस्थितीची जाणीव ठेऊन पर्यावरण मित्र संघटना,भारत यां संपूर्ण भारत देशांत पर्यावरण संरक्षण चे निस्वार्थ कार्य करणाऱ्या संस्थेचे विविध विभागातील तालुका , जिल्हा तसेच राज्य पदाधिकारी माणुसकीचा धर्म सांभाळत यां पूरग्रस्तांसाठी शक्य होईल ती मदत करीत आहेत.
      संस्थेच्या कर्नाटक राज्य संघटक पदावर कार्यरत असलेले श्री.सचिन लोकरे यांनी आपल्या टिम सोबत कर्नाटक राज्यातील यमगरणी, निपाणी, तसेच कोडणी येथील पूरग्रस्तांसाठी सलग ८ दिवस जेवणाचे साहित्य , तसेच इतर आवश्यक वस्तू चे वाटप करण्यात आले.
        त्यांच्या यां कार्या बद्दल संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.देवा तांबे सर , उपाध्यक्षा सौ.वर्षाताई भांडारकर व सचिव श्री जनार्दन सोनवणे सर व संपूर्ण पदाधिकारी टिम यांच्या वतीने कौतुक करण्यात आले आहे.
       तसेच मदतीपासून वंचित असलेल्या पूरग्रस्तांसाठी यां नंतरही आवश्यक त्या ठिकाणी संस्थेच्या पदाधिकारी मार्फत प्रत्यक्ष भेट देऊन उपजीविकेच्या वस्तू , साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक श्री.देवा तांबे यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button