परंडा

पोट निवडणुकीत कॉंग्रेस ( आय ) पक्ष उमेदवार उभा न करता राष्ट्रवादीला पाठींबा

पोट निवडणुकीत कॉंग्रेस ( आय ) पक्ष उमेदवार उभा न करता राष्ट्रवादीला पाठींबा

सुरेश बागडे

परंडा

परंडा नगर परिषदच्या पोट निवडणूकी साठी दि २९ डिसेंबर रोजी मतदान होत असुन या पोट निवडणुकीत कॉंग्रेस ( आय ) पक्ष उमेदवार उभा न करता राष्ट्रवादीला पाठींबा देणार असल्याची घोषणा जिल्हा समन्वयक अॅड नुरोद्दीन चौधरी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली .

सोमवार दि ९ रोजी येथिल शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली या वेळी माजी जिप उपाध्यक्ष अॅड दादासाहेब खरसडे , मा तालूका अध्यक्ष अॅड श्रीकांत भालेराव , माजी नगर अध्यक्ष रमेशसिंह परदेशी , अॅड वाघमोडे , जियावोद्दीन मुजावर , इकबाल मुजावर उपस्थित होते .

या वेळी चौधरी म्हणाले की प्रभाग क्र ७ ब मधील राष्ट्रवादीच्या सदस्या श्रीमती जुलेखा शेख यांचा जुन महिण्यात आकस्मात निधन झाल्याने सदस्य पदाची जागा रिक्त झाल्याने या जागेवर पोट निवडणुक लागली असुन राष्ट्रवादीच्या वतीने त्यांच्या सुनेला उमेदवारी देण्यात येत आहे दि ४ डिसेंबर रोजी पासुन ते दि १२ डिसेंबर रोजी पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे .

राजकीय क्षेत्रात चांगला पायंडा पाडण्या साठी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून राष्ट्रवादीला पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगुन ही पोट निवडणुक बिनविरोध व्हावी या साठी शिवसेना व भाजप नेत्यांना देखील उमेदवार न देण्याबाबत विनंती करणार असल्याचे चौधरी यांनी यावेळी सांगीतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button