परंडा

तहसिलदार हल्ला प्रकरणातील आरोपींना चार दिवसाची पोलिस कोठडी

तहसिलदार हल्ला प्रकरणातील आरोपींना चार दिवसाची पोलिस कोठडी

सुरेश बागडे

परंडा ( सा.वा ) दि १५

परंडा तलसिलदार अनिल कुमार हेळकर यांच्या अंगावर टॅक्टर घालुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या अरोपावरून अटक कण्यात आलेल्या मयुर वाघमारे , आण्णा खडके , संताजी खडके यांना दि १५ रोजी परंडा न्यायालयात हजर केले असता तिघा आरोपींना ४ दिवसाची पोलिस कोठडी सुनावन्यात आली आहे .

परंडा तालूक्यात वाळू माफी यांनी धुमाकुळ घातल्याने कारवाई करण्या साठी पथका सह गेलेल्या परंड्याचे तहसिलदार यांच्या अंगावर वाळू ने भरलेला टॅक्टर घालून दि १४ रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटणा घडली होती या प्रकरणी १२ जनासह ईतर आरोपीवर दि १४ डिसेंबर रोजी विविध कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता .

या मध्ये दि १४ रोजी सायंकाळी मयुर वाघमारे , आण्णा खडके , संताजी खडके या तीन अरोपींना अटक करण्यात आली होती तर इतर अरोपी पसार झाले आहे .

परंडा तालूक्यातील नदी घाटातील वाळू ठेके बंद असल्या मुळे वाळू माफियां कडून तालूक्यातील सिना नदी , उल्का नदी च्या विविध भागातून वाळूचे अवैध उत्खनन करून मोठया प्रमाणात चोरटी विक्री करीत होते .
या वाळू माफीयावर कारवाई करण्या साठी तहसिलदार पथका सह गेले असता त्यांच्या अंगावर टॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता .

[ ]

वाळू माफीया वर कठोर कारवाई करण्या साठी जिल्हा प्रशासणाने कठोर पावले उचलन्याची गरज आहे . तालूक्यात वाळू माफियांची गुंडगीरी वाढत आहे या साठी कठोर कारवाई करावी अशी मागणी जनतेतुन होत आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button