परंडा

देऊळगाव येथे जि मार्ग २ ते बदर वस्ती पर्यंतच्या रस्त्याचे काम अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने निकृष्ठ दर्जाचे..आंदोलनाचा इशारा

देऊळगाव येथे जि मार्ग २ ते बदर वस्ती पर्यंतच्या रस्त्याचे काम अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने निकृष्ठ दर्जाचे..आंदोलनाचा इशारा

सुरेश बागडे

परंडा उस्मानाबाद

परंडा तालूक्यातील देऊळगाव येथे जि मार्ग २ ते बदर वस्ती पर्यंतच्या रस्त्याचे काम अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने निकृष्ठ दर्जाचे झाले असुन सबंधीत रस्ता काम पुन्हा करावे अन्यथा तिव्र अंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड संतोष सुर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदना द्वारे दिला आहे .

दि १० रोजी तहसिलदार मार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की . परंडा तालूक्यातील देऊळगाव येथे जिप्र २ ते बदरवस्ती मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रस्त्याचे काम सुरू असुन सदरील रस्त्याच्या कामावर मुरुम न टाकता माती टाकण्यात येत असुन आवश्यक प्रमाणात खडीचा वापर केलेला नाही
अधिकाऱ्यांच्या आर्शिर्वादाने ठेकेदार बोगस काम करीत आहेत तसेच रस्त्यावर बांधलेला पुल मागील |तिन महीन्या पुर्वी पडलेल्या पावसात वाहुन गेला होता तरी या बोगस कामाची चौकशी करावी व पुन्हा रस्ता करण्याचा आदेश देण्यात यावा अन्यथा अंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button