परंडा

परंडा तालूक्यात वाळू माफीयांचा धुमाकुळ , तहसिलदार यांच्या अंगावर टॅक्टर घालुन जिवे मारण्याचा प्रयत्न

परंडा तालूक्यात वाळू माफीयांचा धुमाकुळ , तहसिलदार यांच्या अंगावर टॅक्टर घालुन जिवे मारण्याचा प्रयत्न

उपविभागीय पोलिस आधिकारी खांबे व उप विभागीय आधिकारी राशीनकर यांची घटणा स्थळी भेट

बारा जनाविरूध्द गुन्हा नोंद

सुरेश बागडे

परंडा ( सा.वा ) दि १४

वाळू माफीयावर कारवाई करण्या साठी पथका सह गेलेल्या परंड्याचे तहसिलदार यांच्या अंगावर वाळू ने भरलेला टॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटणा दि १४ डीसेंबर रोजी सकाळी ५ च्या सुमारास परंडा शहरा जवळ असलेल्या भोत्रा रोडवरील आण्णा खडके यांच्या खडी मशीन येथे घडली या मध्ये तहसिलदार अनिलकुमार हेळकर गंभीर जखमी झाले आहे . या प्रकरणी परंडा पोलिसात बारा जना विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

घटणा स्थळा वरुन तिन टॅक्टर एक टीप्पर तिन मोटार सायकल विद्युत पंप पाईप जप्त करण्यात आले आहे घटणेची माहिती मिळताच भुमचे उपविभागीय पोलिस आधिकारी विशाल खांबे , उपविभागीय आधिकारी( महसुल )
श्रीमती मनिषा राशीनकर पोलिस निरिक्षक इकबाल सय्यद यांनी सकाळी घटणा स्थळी भेट देऊन पाहणी केली .

या बाबत पोलिसा कडून मिळालेली आधिक माहिती अशी की तहसिलदार अनिल कुमार हेळकर यांच्या नेतृत्वाखालील अवैध वाळू उत्खनन विरोधी पथकातील नायब तहसिलदार मिलींद गायकवाड , नागेश करळे कारकुन, मोहन स्वामी तलाठी , अकाश बाभळे लिपीक , प्रशांत गवळी कोतवाल , आशीष ठाकुर आपरेटर , अवैध वाळू उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्याने हे सर्व कर्मचारी भोत्रा रोडवरून सिना नदीकडे जात असताना भोत्रा रोडवरील जमीन सव्हें नंबर १९८ मध्ये आण्णा खडके यांच्या खडी मशीन च्या खदानी जवळ टॅक्टर उभे असल्याचे दिसल्याने तहसिलदार हेळकर व कर्मचारी तेथे गेले असता खदानातील पाण्याने विद्युत पंप बसवुन टॅक्टर मधील वाळू धुत असताना अवैधरित्या वाळू बाळगल्याचे आढळून आले .

वाळू कोठून आणली अशी विचारणा तहसिलदार यांनी केली असता टॅक्टर घेऊन पळण्याचा प्रयत्न करून जिवे मारण्याच्या उद्देशाने तहसिलदार यांच्या अंगावरून चाक घातला या मध्ये तहसिलदार गंभीर जखमी झाले .
त्यांना उपचारा साठी बार्शी येथिल रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे .

या प्रकरणी परंडा सज्जाचे तलाठी चंद्रकांत कसाब यांच्या फिर्यादी वरून आरोपी मयूर वाघमारे , आण्णा खडके , संताजी खडके, संतोष गायकवाड , बच्चन गायकवाड ,सतीश मेहेर , बाळू गायकवाड , धनाजी गायकवाड , प्रशांत गायकवाड , धनंजय काळे सर्व रा परंडा व अरविंद नरूटे, रा . अवारपिंपरी, इंद्रजित महाडीक रा . मुंगशी या बारा जना विरूध्द भादवी चे कलम ३०७ , ३५३ , ३७९ , ३३२, ३३३ , ४२७ , ३४ सह कलम ४८ ( ७ ) , ( ८ ) गौन खनिज अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पो . निरिक्षक इकबाल सय्यद हे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button