Maharashtra

आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेत गोंधळात गोंधळ..! उमेदवारांचे हाल आणि नियोजनाचा फज्जा..!

आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेत गोंधळात गोंधळ..! उमेदवारांचे हाल आणि नियोजनाचा फज्जा..!

मुंबई आरोग्य विभागाची भरती प्रक्रियेत गोंधळ परीक्षेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उघडकीस आला. आरोग्य विभागाच्या ‘क’ गटातील पदांसाठी रविवारी परीक्षा मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह राज्यातील अनेक ठिकाणी पार पडल्या. प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी प्रश्नपत्रिका मिळण्यात विलंब, चुकीच्या पदाच्या प्रश्नपत्रिका, एकाच डेस्क वर दोन उमेदवार असा विचित्र अनुभव विद्यार्थ्यांना आला.मागील महिन्यात या परीक्षा घेण्यात येणार होत्या पण ढिसाळ नियोजन आणि तारखांचा घोळ यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

आरोग्य विभागांतर्गत वर्ग ‘क’ आणि ‘ड’ वर्गाच्या परीक्षा दिल्लीतील न्यासा कम्युनिकेशन्स कंपनी घेणार होती. ही कंपनी निविदा प्रक्रियेतून निवडण्यात आली असून गेल्या महिन्यात या परीक्षा होणार होत्या. मात्र, गेल्या महिन्यात न्यासाने पुरेशी परीक्षा केंद्रे उपलब्ध करून न दिल्यामुळे ऐनवेळी आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळी परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माफी मागितली होती. त्यानंतर २४ ऑक्टोबर आणि ३१ ऑक्टोबर अशा दोन दिवशी या परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. पुन्हा कोणताही गोंधळ होऊ नये आणि परीक्षा यशस्वी व्हावी, यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह संपूर्ण आरोग्य विभागाने कंबर कसली होती.
या अनुषंगाने रविवारी एकूण १७ जिल्ह्यांतील १०२५ केंद्रांवर ५२ संर्वगात या परीक्षा घेण्यात आल्या. सकाळच्या सत्रात २३८ ठिकाणी तर दुपारच्या सत्रात ७८७ ठिकाणी परीक्षा घेण्यात आल्या. मुंबईतील साकीनाका, कोल्हापूर आणि पुणे येथे प्रश्नपत्रिका फुटल्याच्या तक्रारी होत्या तर नाशिक व पुण्यातील पिंपरी- चिंचवड येथे प्रश्नपत्रिका वेळेत पोहोचल्या नाहीत. आठ ठिकाणी प्रश्नपत्रिका असलेल्या पेटीचे डिजिटल लॉक न उघडल्यामुळे पेटीचे लॉक कापून ते उघडावे लागले. काही ठिकाणी न्यासाचे परीक्षा पर्यवेक्षक न पोहोचल्याने ऐनवेळी आरोग्य विभागाला पर्यवेक्षक द्यावे लागले. या गोंधळात परीक्षा उशिराने सुरु झाल्या.विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.दरम्यान अनेकांनी ह्या सर्व गोंधळाला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button