Motha Waghoda

मोठा वाघोदा येथील स्मशानभूमीत सिमेंट बागांचे लोकार्पण पिक संरक्षण समितीचा स्तुत्य उपक्रम

मोठा वाघोदा येथील स्मशानभूमीत सिमेंट बागांचे लोकार्पण पिक संरक्षण समितीचा स्तुत्य उपक्रम

मुबारक तडवी रावेर

मोठा वाघोदा : मोठा वाघोदा ता.रावेर येथील निंभोरा रस्त्यावरील स्मशानभूमीत पीक संरक्षण सह.सोसायटी मोठा वाघोदा यांचे सौजन्याने दहा सिमेंट बाकांचे लोकार्पण करण्यात आले. स्मशानभूमीथ अंत्यविधीसाठी गेले असता नागरिकांना बसण्याची अडचण निर्माण होत असल्याने संस्थेने सामाजिक जबाबदारी स्वीकारत याठिकाणी सिमेंट बाक बसवून दिले. यावेळी संस्थेचे चेअरमन राहुल महाजन, सचिव विजय पाटील, सदस्य सर्वश्री डॉ. मनोहर महाजन, सिताराम महाजन, योगेश पाटील तसेच उपसरपंच लक्ष्मीकांत चौधरी व प्रगतिशील शेतकरी संजय महाजन उपस्थित होते. या कार्याचे ग्रामस्थांकडून आभार व्यक्त केले जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button