Jalana

टाळी वाजून पोट भरणारे तृतीय पंथीना मारहाण

जालना : टाळी वाजून पोट भरणारे तृतीय पंथीना मारहाण आरोपींवर कठोर कारवाई ची मागणी

प्रतिनिधी

जालना शहरातील अंबड चौफुली जवळ आपली पोटाची खळगी भरण्यासाठी टाळी वाजून पोट भरणारे शहरातील तृतीयपंथी यांना अज्ञात तरुणांनी मारहाण केली.

कोरोनाच्या संकटात जालना शहरातील तृतीयपंथी हे आपल्या पोटाची खळगी भरण्याकरिता अंबड चौफुली वर आपल्या तालीच्या आवाजाने दोन पैसे मिळावे यासाठी रोज उभे राहून पोट भरण्याचीसोय करीत आहे परंतु या ठिकाणी काल रात्री काही युवकांनी तेथे येऊन त्याची छेडछाड करून त्यांना मारहाण करण्यात आली आहे.या युवकावर कारवाई व्हावी यासाठी या तृतीयपंथी यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली व या आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button