Chimur

चिमूर ची घोडायात्रा मोजक्या भक्त गणात संपन्न गर्दी टाळण्यात आले पोलिस व देवस्थान पंच कमेटी ला आले यश पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः ओढला घोडा रथ

चिमूर ची घोडायात्रा मोजक्या भक्त गणात संपन्न गर्दी टाळण्यात आले पोलिस व देवस्थान पंच कमेटी ला आले यश पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः ओढला घोडा रथ

ज्ञानेश्वर जुमनाके चिमूर

चिमूर : शतकानुशतके असलेली चिमूर येथील श्रीहरी बालाजी देवस्थान ची घोडा यात्रा असून यंदा मात्रा कोविड मुळे शासनाने नगर भ्रमण ची परवानगी नाकारल्याने घोडा रथ शहर भ्रमण यात्रा खंडित झाली असती परंतु धार्मिक कार्यक्रम अखंड राहण्यासाठी श्रीहरी बालाजी देवस्थान पंच कमेटी व पोलीस अधिकारी यांच्या मध्यस्ती मुळे मोजक्या भक्त गणात घोडा रथ शहर भ्रमण करण्यात यश आले असून विशेषतः पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन बगाटे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड उप पोलीस निरीक्षक अलीम शेख यांनी सुद्धा
स्वयसेवकाच्या माध्यमातून परिक्रमा करीत घोडा रथ ओढून सामाजिक बांधिलकी जपली.

*परंपरा नुसार दरवर्षी श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान येथून रात्रीची घोडा रथ यात्रा नगर भ्रमण करीत असते परंतु यंदा कोविड मुळे सरकारने परवानगी दिली नाही त्यामुळे दि२५ फरवरी च्या रात्रौ १ वा श्रीहरी बालाजी महाराज विष्णू रुपात लाकडी रथावर अश्वरूढ होऊन नगर भ्रमण करण्यात आले यावेळी मोजकेच सेवेकरी, ट्रस्ट चे पदाधिकारी उपस्थित होते.
*शहीद बालाजी रायपूरकर चौक,नेहरू चौक , अहिंसा चौक, ते शिवाजी चौक भ्रमण करीत बालाजी मंदिर मध्ये सकाळी ३ वा नगरभ्रमण करून परत मंदिरासमोर स्थापन्न झाले

*घोडा रथ यात्रेत हजारो भक्त गणांची गर्दी होत असते परंतु कोरोना मुळे कोविड प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलीस प्रशासन समोर मोठं आव्हान होते परंतु पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन बगाटे ,सहायक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड यांनी देवस्थान पंच कमेटी चे अध्यक्ष डॉ मंगेश भलमे, विश्वस्त निलम राचलवार, डॉ दीपक यावले ,अड भोपे यांच्या सोबत समन्वय चर्चा करून धार्मिक असलेली घोडा रथ यात्रा अखंडित रहावी यासाठी त्यांनी मोजक्या भक्त गणात व पोलीस विभागाच्या चोख बंदोबस्त मध्ये परिक्रमन करण्यात यश आले असून स्वतः पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन बगाटे, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड ,उप पोलीस निरीक्षक अलिम शेख पीएसआय गायकवाड यांनी सुद्धा सामाजिक बांधिलकी जोपासत स्वतः घोडा रथ ओढल्याची घटना इतिहासात घडल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

घोडा रथ यात्रेत गर्दी होऊ नये यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या . यात्रेचे प्रसारण टीव्ही, युट्युब, फेसबुक वर प्रसारित करीत असल्याने भक्त गणांनी दर्शन घेतले. आमदार बंटीभाऊ भांगडीया ,माजी आमदार मितेशजी भांगडीया यांनी सुद्धा येऊन दर्शन घेतले*.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button