Chimur

महाराष्ट्र पोलीस दिनानिमित्त जनजागृती मोहीम…

महाराष्ट्र पोलीस दिनानिमित्त जनजागृती मोहीम…

दिनांक 02 जानेवारी/2023 ते 08/जानेवारी/2023 पावेतो महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमीत्य चिमुर पोलीसांनी विविध ठिकाणी जनजागृती केली होती. दिनांक 04/जानेवारी/2023 रोजी पुरुषोत्तमदास बागला कान्व्हेंट चिमुर येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करुन सायबर फ्रॉड व वाहतुक नियमांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ईयत्ता 8 ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन चिमुर येथे भेटी करीता आमंत्रित करुन पोलीस स्टेशनचे कामकाज, CCTNS प्रणाली, शस्त्रे व दारुगोळा ईत्यादीची सविस्तर माहिती देण्यात आली होती. त्यानंतर पुरुषोत्तमदास बागला कान्व्हेंट चिमुर येथे “महाराष्ट्र पोलीस” या विषयावर निबंध तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये इयत्ता 5 ते 7 वी मध्ये शिक्षण घेणारे 103 व इयत्ता 8 ते 9 वी मध्ये शिक्षण घेणारे 60 असे एकुण 163 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आज दिनांक 14/01/2023 रोजी सकाळी 11/00 वा. स्पर्धेतील विजेत्यांना पोलीस निरीक्षक श्री. मनोज गभने, पोलीस उपनिरीक्षक भिष्मराज सोरते, पोलीस नाईक कैलास आलाम व महिला पोलीस अंमलदार महानंदा आंधळे यांचे हस्ते बक्षिस वितरीत करण्यात आले. सदर बक्षिण ‍वितरण कार्यक्रमाकरीता पुरुषोत्तमदास बागला कान्व्हेंट चिमुरच्या मुख्याध्यापिका श्रीमती मिरा पेंडके, उप मुख्याध्यापिका सुनिता जोशी, ईतर सर्व शिक्षक तसेच 650 विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button