Nashik

येवला नगरपालिकेने मागासवर्गीय कर्मचार्‍यांवरील निलंबन कारवाई मागे घ्यावी -महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांची मागणी.

येवला नगरपालिकेने मागासवर्गीय कर्मचार्‍यांवरील निलंबन कारवाई मागे घ्यावी -महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांची मागणी.

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक :आज शुक्रवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर मा.सूरज मांढरे साहेब यांची भेट घेऊन वरील विषयाचे निवेदन देऊन खालील मागण्या मागण्यात आल्या.

1)येवला नगर पालिकेने मागासवर्गीय कर्मचारी 1)श्रावण मोहन जावळे 2)दिपक मोहन जावळे 3)दिपक रामदास उमरे 4)किरण मोहन जावळे यांना अडीच वर्षापासून निलंबित केले असून त्यांना तातडीने परत सेवेत रुजू करून घ्यावे.

2)श्री वाल्मिकी मजूर सहकारी संस्था येवला या मागासवर्गीय संस्थेचे त्वरित बिल अदा करण्यात यावे.

3) लाँकडाऊन काळातील लाईट बिल पन्नास टक्के माफ करून उर्वरित बिल टप्प्याटप्प्याने घेण्यात यावे व अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, रिपाई येवला तालुका अध्यक्ष गुड्डभाई जावळे,युवा नेते मुकेशभाऊ जावळे,अनिकेत जावळे,युवा नेते प्रशांत गांगुर्डे, अरविंद जाधव,रवि गवारे,निलेश कांबळे,युवा नेते विक्रांतभाई गांगुर्डे,सागर भालेराव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

येवला नगरपालिकेने मागासवर्गीय कर्मचार्‍यांवरील निलंबन कारवाई मागे घ्यावी -महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांची मागणी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button