Chimur

Chimur: प्राथमिक शिक्षक भारतीचे अधिवेशन फेब्रुवारीत..!राज्य कार्यकारिणीच्या सभेत अधिवेशनाचा निर्णय

प्राथमिक शिक्षक भारतीचे अधिवेशन फेब्रुवारीत..राज्य कार्यकारिणीच्या सभेत अधिवेशनाचा निर्णय

चिमूर ता, प्र, ज्ञानेश्वर जुमनाके
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या पदाधिकार्‍यांची बैठक दादर, मुंबई येथे आमदार कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला राज्यकार्यकारणी पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत राज्य कार्यकारणी पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांनी सहभाग घेत विविध प्रश्न मांडले.यात प्रामुख्याने वस्तीशाळा शिक्षकांचा प्रश्न, जुनी पेन्शन योजना, डिसीपीस / एनपीएस रक्कम हिशोब, मुख्यालयी राहणे, बदली प्रक्रिया,अनियमित वेतन,पदवीधर शिक्षकांचा प्रश्न, अशैक्षणिक कामे,वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी,सातवा वेतन आयोग उर्वरित हफ्ते यासह राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. येणार्‍या काळामध्ये हे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारती कटिबद्ध असल्याचे नवनाथ गेंड यांनी संगितले.

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात शिक्षक बॅंक, शिक्षक पतसंस्थेमधील संचालकपदी निवड झालेल्या शिक्षक भारती शिलेदारांचे आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे दुसरे राज्यव्यापी अधिवेशन फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.बैठकीला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती पदाधिकारी भरत शेलार, दिनेश खोसे,किशोर कदम,विनोद कडव,बबन गावडे,दया नाईक,संजय म्हस्के,प्रकाश ब्राम्हणकर,स्वाती बेंडभर,पप्पू मुलानी,चिमणाजी दळवी,सतीश रावजादे,सतीश हुले,किशोर कुमावत,राजेंद्र दिघे,नजीर पठाण,निलेश पाटील,सुरेश डांगे
तसेच जिल्हा अध्यक्ष, जिल्हा कार्यकारणी, तालुका अध्यक्ष, तालुका कार्यकारणी आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button