Chimur

राष्ट्र सेवा दल आयोजित राज्यस्तरीय स्वातंत्र्य करंडक स्पर्धांचे निकाल जाहीर

राष्ट्र सेवा दल आयोजित राज्यस्तरीय स्वातंत्र्य करंडक स्पर्धांचे निकाल जाहीर

वेशभूषा स्पर्धा, समूह प्रसंग स्पर्धांत जिल्ह्यातील पाच शाळांनी मारली बाजी
चिमूर ता, प्र, ज्ञानेश्वर जुमनाके
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्र सेवा दलातर्फे महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि शाळांसाठी वेशभूषा स्पर्धा, समूह प्रसंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात वेशभूषा स्पर्धेकरिता महात्मा गांधी,लोकमान्य टिळक,पं.नेहरू,भगतसिंह,राजगुरु,सुखदेव,सुभाषचंद्र बोस,मौलाना आझाद,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,सावित्रीमाई फुले,फातिमा शेख,छत्रपती शाहू महाराज,साने गुरुजी,झाशीची राणी,बिरसा मुंडा,जयपालसिंह मुंडा आदी महापुरुषांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारून स्पर्धेत सहभाग नोंदवला.समूह प्रसंग सादरीकरण स्पर्धेत सामाजिक न्याय व स्वातंत्र्य चळवळीतील छोटे छोटे प्रसंग जसे- चलेजावची चळवळ,आझाद हिंद फौज,महाडचा सत्याग्रह,शिरिषकुमारचे बलिदान आदी प्रसंग विद्यार्थ्यांनी साकारले.

या राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धा व समूह प्रसंग सादरीकरण स्पर्धेत महाराष्ट्रातील शाळा व विद्यार्थ्यांचा सहभाग उत्स्फूर्त होता. या स्पर्धाचा अलीकडेच राष्ट्र सेवा दल राज्य कार्याध्यक्ष अर्जून कोकाटे, राज्य सचिव नवनाथ गेंड यांनी निकाल जाहीर केला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातून वेशभूषा स्पर्धेत राज्यस्तरीय विशेष पुरस्कार जि.प.प्रा. शाळा, बरडघाट, विदर्भ विभागीयस्तरावर जि.प.उच्च प्रा.शाळा, लक्कडकोट आणि जि. प.उच्च प्रा.शाळा, लोंढोली या शाळांनी बाजी मारली असून समूह प्रसंग सादरीकरण स्पर्धेत जि.प.उच्च प्रा. शाळा, कुंभेझरी आणि जि. प. प्रा. शाळा, चांदापूर हेटी येथील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय पुरस्कार पटकावला. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.सर्वोत्कृष्ठ २५ शाळांना स्वातंत्र्य करंडक देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्र सेवा दल मंडळ सदस्य तथा शिक्षक भारती विभागीय सरचिटणीस सुरेश डांगे यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button