Chimur

चिमुर तालुक्यातील बि. एल. ओ. मानधनापासुन वंचित तात्काळ मानधन देण्यात यावे कवडू लोहकरे यांनी दिला आंदोलनाचा इशारा

चिमुर तालुक्यातील बि. एल. ओ. मानधनापासुन वंचित तात्काळ मानधन देण्यात यावे कवडू लोहकरे यांनी दिला आंदोलनाचा इशारा

जुमनाके चिमुर

चिमूर : चिमुर तालुक्यातील १८वर्ष पुर्ण झालेला व्यक्ती अथवा युवक मतदानापासून वंचित राहु नये यासाठी शिक्षक बि एल ओ चे काम पार पाडीत आहे. कोरोना संकट काळात आपल्या जिवाची पर्वा न करता व आपल्या कुटुंबाची चिंता करता क़ठिन प्रसंगी शिक्षकांनी बि एल ओ चे अतिरिक्त काम पार पाडले.सतत दोन वर्षांपासून तहसिल कार्यालयाकडून थकित मानधन मिळाले नाही. शासन निर्णय नुसार शासनाने वार्षिक मानधन जाहीर केले. पण २०१८पासुन चिमुर तालुक्यातील बि एल ओ ना अजुनही मानधन मिळाले नाही.

शासनाने शिक्षण अतिरीक्त कामाचा बोझा म्हणून शिक्षकांवर बि. एल ओ ची ची जबाबदारी मस्तकी मारण्यात आली. कोरोना संकट काळात मतदारांचे नाव यादीत समाविष्ट करण्यासाठी आवेदन स्विकारने, यादीतून मृत व्यक्तीचे नावे वगळने, दुबार यादी देणे, फोटो नसेल तर फोटो देणे, मतदान कार्ड घरोघरी जाऊन वाटप करने आदी कामे केली. परंतु शासनाने अजुनही मानधन न दिल्याने बि. एल ओ मध्ये असंतोष पेटला आहे. काही वर्षे शासनाने मानधन दिले परंतु आता दोन वर्षापासून शिक्षक मानधनापासुन वंचित आहे. त्वरित शासनाने मानधन न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघ चिमुर चे कवडू लोहकरे यांनी शासनाला दिला आहे.

चिमुर तालुक्यातील बि. एल. ओ. मानधनापासुन वंचित तात्काळ मानधन देण्यात यावे कवडू लोहकरे यांनी दिला आंदोलनाचा इशारा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button