Dhule

इयत्ता पाचवी च्या तुकड्या माध्यमिक शाळांना सोडून इतर प्राथमिक शाळांना जोडण्याच्या निर्णयाच्या विरोधात निवेदन

इयत्ता पाचवी च्या तुकड्या माध्यमिक शाळांना सोडून इतर प्राथमिक शाळांना जोडण्याच्या निर्णयाच्या विरोधात निवेदन

असद खाटीक

इयत्ता पाचवी च्या तुकड्या माध्यमिक शाळांना सोडून इतर प्राथमिक शाळांना जोडण्याचा जो अन्याय कारक शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने काढला त्या शासन निर्णय आला स्थगिती मिळावी यासाठी माननीय बच्चू भाऊ कडू राज्यमंत्री शालेय शिक्षण यांचे OSD श्री बोरसे साहेब यांना नंदुरबार जिल्हा शिक्षकेतर संघ नंदुरबार यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.

या शासन निर्णयामुळे विद्यार्थी संख्या कमी झाल्याने अनेक शाळांमध्ये लिपिक,शिपाई, ग्रंथपाल, प्रयोगशाळा साहाय्य, परीचर इतर शिक्षकेतर पदे अतिरिक्त होण्याचा प्रश्न निर्माण होईल म्हणून हा शासन निर्णय शासनाने स्थगित करून कोणतीही कारवाई करू नये अशी विनंती करण्यात आली यावेळी नंदुरबार जिल्हा शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ चे नाशिक विभागीय कार्यवाह श्री डीपी महाले नंदुरबार जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे सचिव सय्यद इसरार उपाध्यक्ष जुबेर शेख कोषाध्यक्ष श्री जयेश वाणी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रशांत पवार आदी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button