Champa

चांप्यात महिला प्रशिक्षण केंद्रात मास्क बनविण्याचे प्रशिक्षण घेत आहे आदिवासी महिला

कोरोनाशी लढा देण्यासाठी चांप्याच्या सरपंचानी कसली कंबर

चांप्यात महिला प्रशिक्षण केंद्रात मास्क बनविण्याचे प्रशिक्षण घेत आहे आदिवासी महिला

सरपंच अतिश पवार यांच्या मदतीने गरजूना नि:शुल्क वितरण

चांपा:अनिल पवार

कोरोनाशी लढा देण्यासाठी सरपंच अतिश पवार यांनी कंबर कसली आहे .कोरोना या महाभयंकर आजारापासून बचावासाठी वापरण्यात येणारे मास्क गावात बनवता यावेत .याकरिता सरपंच अतिश पवार यांनी पुढाकार घेतला. गावांतील महिला बचत गट व आदिवासी महिलांना गावातच कोरोनापासून बचावासाठी वापरण्यात येणारे मास्क गावात बनवता यावेत करिता चांप्यात ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या महिला शिलाई प्रशिक्षण केंद्रात सरपंच अतिश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उमरेड येथील नेहरू युवा केंद्राच्या तालुका समन्वयक प्रियंका लोहबरे यांनी शिलाई प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांना मास्क तयार करण्याचे एकदिवसीय प्रशिक्षण दिले . या उपक्रमामुळे गावांतील महिला बचत गट व आदिवासी महिलांच्या हाताला काम मिळाले .

चांप्यात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सरपंच अतिश पवार यांनी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या .त्यात धूळ फवारणी , जंतूनाशक फवारणी , ध्वनिक्षेपणाद्वारे गावात जनजागृती , गरजूना अन्नधान्य किटचे मोफत वितरण , मास्कचे वितरण व सोबतच गावांतील महिलांना घरच्याघरी मास्क बनविण्यासाठी प्रभावी उपक्रम’ सरपंच अतिश पवार यांनी हाती घेतला.व सोबतच गावात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मास्क वापराचे महत्व पटवून दिले .घरगुती मास्क बनविण्यासाठी कोणकोणती खबरदारी घ्यावी , मास्कचा वापर कसा करावा, मास्क का वापरावा , मास्क वापरत असतांना स्वच्छतेची कोणकोणती काळजी घ्यावी ,इत्यादी मार्गदर्शन सरपंच अतिश पवार यांनी दिले .

एकदिवसीय प्रशिक्षणात घरगुती मास्क तयार करण्याचे प्रशिक्षण दिल्याने .महिलांना घरगुती मास्क तयार करण्यासाठी मदत केली .त्यामुळे सध्याच्या कठीण परिस्थितीत गावांतील महिला बचत गट व आदिवासी महिलांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत झाली आहे .

महिला शिलाई प्रशिक्षण केंद्रात बनविलेले सर्व मास्क गावांत राहणाऱ्या गरजु नागरिकांना सरपंच अतिश पवार यांच्या हस्ते मोफत मास्क वितरण करण्यात आले .यावेळी सरपंच अतिश पवार , उपसरपंच अर्चना सिरसाम , प्रियंका लोहबरे , ग्रामसचिव बि बि वैद्य आदीच्या उपस्थीत गावात मोफत मास्क वाटप करण्यात आले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button