Champa

राष्ट्रीय जय आदिवासी युवा शक्ती संघटनेच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षपदी सौ.अर्चना मडावी

राष्ट्रीय जय आदिवासी युवा शक्ती संघटनेच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षपदी सौ.अर्चना मडावी

अनिल पवार

चांपा, ता,२: देशात आदिवासींवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावरोधात व आदिवासीं बांधवांच्या हक्क व न्याय मागण्यासाठी अन्नसत्याग्रह आंदोलन व इत्यादी बेमुदत आंदोलनच्या माध्यमातून न्याय मिळवून देणे, आदी विषयांवर संपूर्ण देशात लॉकडाऊनमुळे आदिवासींवर झालेल्या परिणाम लक्षात घेता.३१ मे रोजी राष्ट्रीय जय आदिवासी युवा शक्ती संघटनेची राष्ट्रीय कार्यकारणी गुगल मिट वर जाहीर करण्यात आली. यावेळी मध्यप्रदेश,गुजरात,राजस्थान महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा, आदी देशभरातील १० राज्यातील आदिवासीं बुध्दजीवी समाजसेवक, व समाज सेविका यांची गुगल मिट वर ऑनलाईन पद्धतीने बैठक घेण्यात आली. देशात आदिवासींच्या विकासासाठी जल जमीन जंगल या विषयावर चर्चा केली.

देशात दुर्गम भागातील आदिवासी बांधवांची उपासमार होत असल्याने त्यांची अन्नधान्यासारखी मूलभूत गरज लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी केन्द्र सरकार व राज्य सरकारने त्वरित पुढाकार घ्यावा, व अन्नधान्यासारख्या प्राथमिक बाबींसाठी आदिवासीं बांधवांना रस्त्यावर आंदोलन करण्याचा इशारा ही यावेळी देण्यात आला. बहुतांश आदिवासींचे हातावर पोट असल्याने कोविड १९ लॉकडाऊनचा देशात सर्वाधिक फटका आदिवासीं बांधवांना बसला आहे . लॉकडाऊनमुळे हाताला काम मिळत नाही व शासनाकडूनही अन्नधान्य मिळत नसल्याने त्यांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे.

देशात आदिवासींवर वाढत्या अन्याय अत्याचार रोखण्यासाठी ३१ मे रोजी ऑनलाईन गुगल मिट ने जय आदिवासी युवा शक्ती संघटनेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली . त्यात जय आदिवासी युवा शक्ती संघटनेच्या महाराष्ट्राच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी आदिवासी समाजसेविका सौ.अर्चना मडावी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

आदिवासी ची अस्मिता राखण्यासाठी आपल्या संस्थेकडू हिंगणा तालुक्यात जागतिक मूलनिवासी दिवस साजरा करण्यास सुरूवात केली. त्याचप्रमाने आदिवासी शेतकरी बांधव त्याचप्रमणें विद्यार्थ्यांना आदिवासी एकत्मिक प्रकल्प विभागाकडून मिळणाऱ्या विविध योजनांची माहिती पुरविण्याचा प्रयत्न विविध कार्यक्रम चा मध्यांमतून करत आहे . त्याचप्रमाणे आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी गोंडी डान्स ग्रुप ची स्थापना केली.

महिलांनी आत्म निर्भर व्ह्याव यासाठी धपड सुरू आहे .महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून उदोजिकेसाठी आवश्यक संसाधन व्यक्ती ना बोलावणे विवध बचत गटांना प्रोत्साहित करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करने शिक्षित मुलांना रोजगार संधी मिळाव्यात यासाठी करियर कन्सेलीग ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात मदत करणे इत्यादी आदिवासींच्या समाज उपयोगी कामे केल्याने त्यांची राष्ट्रीय जय आदिवासी युवा शक्ती संघटनेच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षपदी सौ.अर्चना मडावी यांची निवड करण्यात आली. असुन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी राष्ट्रिय जय आदिवासी युवा संघटनेकडून व सोबतच संपूर्ण महाराष्ट्रातून आदिवासीं बांधवांकडून शुभेच्छा वर्षाव करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button