Champa

रमजान ईद दिनानिमत्ताने सरपंच अतिश पवार यांच्या हस्ते मुस्लिम बांधवांना अन्नधान्य किटचे वाटप

रमजान ईद दिनानिमत्ताने सरपंच अतिश पवार यांच्या हस्ते मुस्लिम बांधवांना अन्नधान्य किटचे वाटप

अनिल पवार

चांपा, ता.२५: चांप्याचे सरपंच अतिश पवार यांनी गावातील मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या. व सोबतच काही मुस्लिम बांधव चांपा येथे गेल्या १४ वर्षापासून आपले वास्तव्य करीत आहे.

गावात मुस्लिम बांधवांकडे राशन कार्ड नसल्याने त्यांना लॉकडाऊन चां चांगलाच फटका बसला आहे. असुन आपल्या पोटपण्यासाठी ते टायर पंक्चरच्या व्यवसायातून मिळालेली रकमेतून आपला व कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत होते.

गावात टायर पंक्चर दुरुस्तीचा व्यवसाय करीत असताना जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे हा व्यवसाय बंद पडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली .

गावात कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून काळजी घेत सरपंच अतिश पवार यांनी मुस्लिम बांधवांकडे राशन कार्ड नसतांना देखील त्यांना राशन दुकानातून राशन मिळवून दिले.

मुस्लिम बांधवांच्या घराची रमजान ईद साजरी व्हावी यासाठी “अभी नहीं” तो “फिर कब”, ग्रुप तर्फे सरपंच अतिश पवार यांनी रमजान ईद मुबारक देताना सोबतच अन्नधान्याच्या किट वाटप केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button