Champa

चांप्यात मनरेगा योजनेअंतर्गत २४ मजुरांना मिळाला रोजगार, ;सरपंच अतिश पवार यांचा पुढाकार

चांप्यात मनरेगा योजनेअंतर्गत २४ मजुरांना मिळाला रोजगार, ;सरपंच अतिश पवार यांचा पुढाकार

अनिल पवार

चांपा लॉकडाऊनमुळे शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाचा तितकासा फैलाव झालेला नाही, देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी खेड्यापाड्यांमध्ये मजुरांसाठी दुरुस्तीचे काम, रस्त्याचे काम व तसेच खोद काम मिळत होते. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली नव्हती. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात टाळेबंदी असल्याने दीड महिन्यापासून मजुरांना दुरुस्तीचे काम, रस्त्याचे काम व तसेच खोद काम बंद झाल्याने शेतकरी, गरीब मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाची लागण झालेली नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार हमी योजना किंवा नरेगा योजनेंतर्गत काम देण्यात यावे, त्यासाठी उमरेड तालुक्यांतील चांप्याचे सरपंच अतिश पवार यांनी चांपा गावातील जास्तीजास्त बेरोजगार मजुरांना काम देण्यास स्वतः ग्रामपंचायतीकडे अर्ज मागितले. त्यात कागदोपत्री पूर्ण असणाऱ्या अती आवश्यक असलेल्या २४ बेरोजगार मजुरांना तत्काळ मनरेगा योजनेअंतर्गत काम मिळून दिल्याबदद्ल मजुरांनी सरपंच अतिश पवार यांचे आभार मानले..

व सोबतच गावातील इच्छुक मजुरांना रोजगार हमी योजना किंवा नरेगा योजनेंतर्गत काम मिळून देण्यासाठी जॉब कार्ड तयार करण्यास आवश्यक कागदोपत्रेही गोळा केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button