Champa

शेतकऱ्यांनी केलेली अतिक्रमित जमीन वनविभागाने घेतली ताब्यात! उत्तर वनपरिक्षेत्र अधिकारी उमरेड यांची सलग दुसरी मोठी कारवाई

शेतकऱ्यांनी केलेली अतिक्रमित जमीन वनविभागाने घेतली ताब्यात!

उत्तर वनपरिक्षेत्र अधिकारी उमरेड यांची सलग दुसरी मोठी कारवाई

ब्राह्मणी (आपतूर) नियतक्षेत्र उदासा वन विभागाची जमीन आहे. शेतकऱ्यांनी ती जमीन अतिक्रमण करून अनधिकृतपणे ताब्यात घेऊन त्या जमिनीवर पेरणीची कामे सुरू करणार तत्पूर्वी…

मौजा ब्राम्ही (आपतूर) उपवनक्षेत्र मकरधोकडा शिवारातील कारवाई

अनिल पवार

चांपा, ता.३१ : उमरेड
उमरेड तालुक्यातील ब्रम्ही (आपतूर)शिवारातील वनविभागाच्या जागेवर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून ती जमीन बळकावली होती मात्र वनअधिकाऱ्यांनी याप्रकरणाची चौकशी करत आणि बळकावलेली वन विभागाची जमीन शुक्रवार रोजी ताब्यात घेतली अतिक्रमण धारकाच्या नावाने वन गुन्हा क्रमांक ३३/६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.

ब्राह्मणी (आपतूर) नियतक्षेत्र उदासा वन विभागाची जमीन आहे. शेतकऱ्यांनी ती जमीन अतिक्रमण करून अनधिकृतपणे ताब्यात घेऊन त्या जमिनीवर पेरणीची कामे सुरू करणार तत्पूर्वी वनरक्षक श्री वाय के अंबाझिरे रक्षक उदासा यांनी वरिष्ठ अधिकारी यांना सदर अतिक्रमणाबाबत सूचना दिली. त्यावरून उत्तर उमरेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए. के. मडावी यांनी मोक्यावर येऊन जमिनीची पाहणी केली.

अतिक्रमण गटात जेसीबीच्या सहाय्याने समतल चर खोदण्याचे काम करण्यात आले त्यात दीपक धनराज मानकर (रा. आपतुर) या शेतकऱ्याने सर्वे क्र. १० मध्ये १.२० हेक्टर आर क्षेत्रात तसेच गंगाधर शंकर सहारे यांनी सर्वे क्र १० मध्ये .८० आर हेक्टर क्षेत्रामध्ये अतिक्रमण करून शासनाची जागा बळकावल्याचे निदर्शनास आले त्यावरून ही संपूर्ण शासकीय जमीन अतिक्रमण धारक शेतकऱ्यांकडून काढून घेत वन विभागाने आपल्या ताब्यात घेऊन या जमिनीवर सलग समपातळी चराचे काम केल्याची माहिती एके मडावी यांनी दिली.

उपवनसंरक्षक नागपूर वनविभाग श्री प्रभुनाथ शुक्ला तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्री नरेंद्र चांदेवार यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी श्री एके मडावी यांच्या उपस्थितीत तथा अन्य अधिकारी , वनमजूर आदींच्या उपस्थितीत पार पडली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button