चांपा/नागपूर

चांपा येथे १४४वी बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

चांपा येथे १४४वी बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

अनिल पवार

चांपा ता , १५:आदिवासी समाजाचे आद्यप्रवर्तक क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची १४४वी जयंती शुक्रवारी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.
या निमित्त काढण्यात आलेल्या अभिवादन रॅलीला आदिवासी स्मारक चौकात सरपंच अतिश पवार व उपसरपंच अर्चना अजय सिरसाम यांनी पिवळी झेंडी दाखवून सुरूवात केली.तत्पूर्वी सर्व मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ही मिरवणूक आदिवासी स्मारक , चौक, आठवडी बाजार या मार्गे जाऊन गट ग्रामपंचायत कार्यालयात रॅलीचा समारोप झाला. या कार्यक्रमाला सरपंच अतिश पवार , आदिवासी समाजसेवी अजय सिरसाम ,सुरेश मसराम , ईश्वर इरपाते , झीत्रु तोडासे , बंडू तोडासे , कृष्णा तोडसाम , बिरसा महिला बचत गटचे मिराबाई मसराम , वैशाली वरठी , अस्मिता अरतपायरे , मालुबाई मडावी , आदींसह अनेकांची उपस्थिती होती.यशस्वितेसाठी आदिवासी युवा सेनेचे शिवशंकर राजपूत , अमित इरपाते , कृष्णा इरपाते , आशिष तोडासे , सुमीत वाढवे, सुरेंद्र नेहारे , विजय अरतपायरे , संदीप , मारोती वरठी , आदींसह अनेकांनी परिश्रम घेतले. गावांतील आदिवासी बांधव आदींसह मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थितीत आदिवासी स्मारक येथे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button