Maharashtra

माणुसकीचा परिचय देत नाट्य मंडळाने केली परप्रांतीय मजुरांना मदत

मागील काही दिवसांपासून मौजा खांबाडा येथे काही परप्रांतीय मजूर स्वच्छ भारत अभियान चे शौचालय बांधकाम करीत असून मागील दहा ते पंधरा दिवसांपासून ग्राम पंचायत ने उपलब्ध करून दिलेल्या इमारतीत ते वास्तव्यास आहेत. संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असून त्याचा प्रादुर्भाव भारतातही झपाट्याने वाढल्यामुळे केंद्र शासनाने संपूर्ण देशात संचारबंदी लागू केलेली आहे. स्थानिक लोकांनासुध्दा केवळ जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर येण्याची मुभा आहे. स्थानिक लोकांची सुध्दा अन्नधान्याची व्यवस्था करताना दाणादाण होत आहे त्यात परप्रांतीय मजुरांना उदरनिर्वाह कसा करावा हा जिकिरीचा प्रश्न पडला होता. त्यांची ही वाताहत नवचैतन्य नाट्य रंगभूमी खांबाडा च्या पदाधिकाऱ्यांना माहिती होताच त्यांनी सदर मजुरांना राशन तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून त्यांना पुढील पंधरा ते वीस दिवस अन्नसाठा पुरेल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच याबाबत आरोग्य विभागाला माहिती देऊन त्यांची पूर्वतपासणी सुध्दा करण्यात आलेली असून त्यांची दैनंदिन निरीक्षणे नोंदविली जात आहेत.
नवचैतन्य नाट्य रंगभूमी खांबाडा च्या माध्यमातून आजवर कित्येक समाजकार्य करण्यात आले असून आत्ताही सर्वत्र कोरोना विषाणूचा तीव्र प्रादुर्भाव असतानाही या 15 मजुरांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करून माणुसकी अद्यापही जिवंत असल्याचा प्रत्यय दिलेला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button