चांपा/नागपूर

चांपा येथे ७०वा संविधान दिवस विविध ठिकाणी थाटामाटात साजरा

चांपा येथे ७०वा संविधान दिवस विविध ठिकाणी थाटामाटात साजरा

अनिल पवार

चांपा ता , २६:- चांपा येथे भारतीय संविधानाचा ७०वा वर्धापन दिन चांपा येथे ठिकठिकाणी थाटामाटात साजरा करण्यात आला .चांपा येथील जिल्हापरिषद शाळा, विजय महाविद्यालय, त्रिरत्न बौध्द विहार आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .यावेळी भारताचे एक सार्वभौम , समाजवादी , धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविणाऱ्या व सर्व नागरिकांस सामाजिक , आर्थिक व राजनैतिक न्याय , विचार , अभिव्यक्ती , विश्वास , श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य व समानता प्राप्त करून देण्याच्या अनुषंगाने दिनांक २६नोव्हेंबर १९४९रोजी भारताची स्वतंत्र राज्यघटना अंगीक्रूत आणि अधिनियमीत करून स्वतःप्रत अर्पण केलेली आहे .

सदर राज्य घटना ही दि .२६जानेवारी १९५०पासून अमलात आली तरी भारतीय संविधानाची माहिती अजूनही देशाच्या बहुतेक ग्रामिण भागातील नागरिकांपर्यंत संविधान पोहचले नसून आज चांपा येथे सरपंच अतिश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे सामूहिकरित्या वाचन करण्यात आले.

सरपंच अतिश पवार व उपसरपंच अर्चना सिरसाम यांनी भारतीय राज्यघटना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला दीप प्रज्वलित करुन व माल्यार्पन करुन पूजा अर्चना केली. सोबत ग्रा.पं. पदाधिकारी व ग्रामस्थानी पूजा अर्चना केली.

चांपा येथील सरपंच अतिश पवार यांनी संविधानावर प्रकाश टाकत गावकऱ्यांना संविधानाचे महत्व सांगितले. ग्रा.पं. सदस्य सफल मून यांनी संविधानाची स्तुती करुन आजचा दिवस इतिहास जमा असल्याचे म्हटले. कार्यक्रमाला ग्रा .प सदस्य मिराबाई मसराम , अस्मिता अरतपायरे , पोलिस पाटील हंसराज नगराळे ,कोतवाल रवी ऊके , ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र नेहारे, प्रभाकर खाटिक , क्रुष्णा इरपाते, विजय अरतपायरे , मारोती वरठी , सुरेंद्र लांबोदरी , प्रणय मडके , अनिता खंडाळे , वसंता कांबळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. संचालन करून आभार ग्रामविकास अधिकारी बि बि वैद्य यांनी मानले.

संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क आणि अधिकार दिले आहेत. यामुळे आज आपण लोकप्रतिनिधी निवडू शकतो. त्यांना जाब विचारू शकतो. संविधानामुळे आज सर्वसामान्य नागरिकाला महत्त्व प्राप्त झाले आहे. :- *सरपंच अतिश पवार* ग्रामपंचायत चांपा,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button