चांपा/नागपूर

माझी लढाई उमरेडच्या विकासासाठीच-:आमदार सुधीर पारवे 

माझी लढाई उमरेडच्या विकासासाठीच-:आमदार सुधीर पारवे

चांपा प्रतिनिधी अनिल पवार

उमरेड विधानसभेच्या विकासाचे एकमेव ध्येय पुढे ठेऊन मागील दहा वर्षात आजवर काम करीत आलो .विकासकामांत कुठलेही राजकारण न करता निःपक्षपणे उमरेड विधानसभेच्या सर्वच भागाला विकासाच्या समान संधी देत मागील दहा वर्षात कोट्यवधीची विकासकामे केलीत .नागपुर -उमरेड महामार्गाचे चौपदरीकरण तर नागपुर ते कुही मांडळ ते आंभोरा महामार्गासाठी निधी मंजूर करून उमरेड विधानसभेच्या गावागावात रस्त्याचे जाळे पसरवले ,उमरेड विधानसभेत साडेचारशे गावांतील नागरिकांच्या समस्या बेरोजगार युवकांसाठी केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार उपलब्ध करून देण्याचं आव्हान महायुतीचे उमेदवार सुधीर पारवे यांनी केले .माझी लढाई ही उमरेड विधानसभेच्या विकासासाठीच आहे .त्यात कधीही तडजोड मी करणार नाही , अशी ग्वाही भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायूतीचे उमेदवार सुधीर पारवे यांनी दिली .उमरेड विधानसभा क्षेत्रांतील भिवापुर तालुक्यातील नांद जिल्हापरिषद क्षेत्रातील एकूण २२गावांमध्ये सधन प्रचार दौरा संपन्न झाला .या प्रसंगी वरिल गावातील भाजपा कार्यकर्ते व सामान्य नागरिकांनी भाजपचे उमेदवार सुधीर पारवे यांचे औक्षण करून पुष्पहाराने उत्स्फूर्तपणे स्वागत केले .व तसेच उमरेड तालुक्यातील मकरधोकडा ,पाचगाव वायगाव ,सिर्शि , जिल्हापरिषद सर्कल व उमरेड शहराच्या विविध भागांत सुधीर पारवे यांनी रॅलीद्वारे मतदारांशी संपर्क साधला असता मतदारांनी त्यांना संपुर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही दिली .त्यानंतर रविवारी कुही , मांडळ येथे भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायूतीचे उमेदवार सुधीर पारवे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी , ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले .यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी उमरेड विधानसभेच्या मागील दहा वर्षांच्या झालेल्या विकासकामांवरून महायुतीचे उमेदवार सुधीर पारवे यांना निवडुन देण्याचं आव्हान केले . तर सोमवारी कुही जिल्हापरिषद सर्कलमध्ये तर मंगळवारी बेला सिर्षि येथील मतदारांशी संवाद साधला .त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या .परिसरातील विविध कामांचा लेखाजोखा यावेळी मांडण्यात आला .
आज बेला जिल्हा परिषद सर्कल मधील प्रचार यात्रेत नागरिकांशी संवाद साधला व त्यांचा आशीर्वाद घेतला.प्रचार यात्रेत महायुतीचे कार्यकर्ते व उपस्थित सर्व नागरिक जे प्रेम देत आहेत त्या वरून मला हा विश्वास आहे की २१ऑक्टोबर ला मोठया मताधिक्याने निवडुन उमरेड विधानसभेची जनता मला त्यांची सेवा करण्याची संधी देणार असल्याचे भाजपचे उमेदवार सुधीर पारवे यांनी सांगितले .
पदयात्रेला खासदार कृपाल तुमाने भाजपचे उमेदवार सुधीर पारवे , उमरेड कृ.ऊ.बा .समितीचे सभापती रुपचंद कडु, माझी जिल्हापरिषद महिला व बालकल्याण समितीची सभापती पुष्पा वाघाडे , महायुतीचे पदाधिकारी बूथप्रमुख मोठया संख्येने कार्यकर्ते व नागरीक बहूसंख्येने उपस्थित होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button