चांपा/नागपूर

चांपा येथे सरपंचाच्या पुढाकाराने ज्येष्ठांना मिळाले एसटीचे ‘स्मार्ट कार्ड’

चांपा येथे सरपंचाच्या पुढाकाराने ज्येष्ठांना मिळाले एसटीचे ‘स्मार्ट कार्ड’

अनिल पवार

चांपा ः राज्य परिवहन महामंडळातील (एस.टी.) विविध सवलत योजनांसाठी “स्मार्ट कार्ड’ योजना राज्य सरकारने लागू केली आहे. त्याचा लाभ चांपा येथील प्रवाशांना मिळणार असून, चांपा येथील २२ज्येष्ठ नागरिकांची उमरेड आगारात प्रवाशांची या योजनेत नोंद झाली आहे. चांपा ग्रामपंचायतचे सरपंच अतिश पवार यांच्या पुढाकाराने महिना भरात २२ ज्येष्ठांना “स्मार्ट कार्ड’ देण्यात आले.
एसटी बसने प्रवास करताना सवलती घ्यायच्या असतील, तर प्रवाशांना आधार कार्ड सक्तीचे असल्याबाबतचा गैरसमज काही वाहकांमध्ये आहे. यामुळे “स्मार्ट कार्ड’ योजना सुरू केली आहे. परंतु “स्मार्ट कार्ड’ मिळत नाही तोपर्यंत मतदान ओळखपत्र, लायसन्स, आधार कार्ड यांसह विविध ओळखीचे पुरावे ग्राह्य धरूनच प्रवाशांना सवलत देण्यात येणार आहे. राज्य परिवहन महामंडळातील 15 योजनांसाठी लाभार्थ्यांना “स्मार्ट कार्ड’ देण्याचा निर्णय घेतला आहे. यात पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक योजनेची अंमलबजावणीसाठी सरपंच अतिश पवार यांच्या प्रयत्नातून चांपा येथे जेष्ठ नागरिकांसाठी एस, टी स्मार्ट कार्डचे शिबिर चांपा ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आले त्यानुसार २२लाभार्थ्यांना मानवी हक्क दिवसाचे औचित्य साधून सरपंच अतिश पवार यांच्या हस्ते गरजू ज्येष्ठांना “स्मार्ट कार्ड’चे वाटप करण्यात आले .यावेळी सरपंच अतिश पवार यांनी मानवी हक्क संबंधित नागरिकांना मार्गदर्शन केले .श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनाचे २८ वयोवृद्ध लाभार्थ्यांनी सरपंच अतिश पवार यांचे आभार व्यक्त केले व सर्व लाभार्थ्यांच्या चहऱ्यावर हास्य फुलले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button