Solapur

डॉ. भागिरथी गिरी मॅडम वरिष्ठ अधिव्याख्याता डाइट लातुर यांचे मार्गदर्शनाखाली केंद्र अरण व कुर्डुवाडी बिट ची ब्रिज कोर्स कार्यशाळा संपन्न

डॉ. भागिरथी गिरी मॅडम वरिष्ठ अधिव्याख्याता डाइट लातुर यांचे मार्गदर्शनाखाली केंद्र अरण व कुर्डुवाडी बिट ची ब्रिज कोर्स कार्यशाळा संपन्न.

सोलापूर : दिनांक..३/७/२०२१ रोजी केंद्र अरण आणि कुर्डूवाडी बीट तालुका माढा जिल्हा सोलापूर यांची संयुक्त शिक्षण परिषद, कार्यशाळा गुगल मीट ॲप द्वारे ऑनलाईन संपन्न झाली.
यावेळी ब्रिज कोर्समध्ये शिक्षकांनी फक्त सुलभकाच्या भूमिकेत राहावे असे प्रतिपादन डॉ. भागीरथी गिरी वरिष्ठ अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था लातूर यांनी केले.
या ऑनलाइन शिक्षण परिषदेचे आयोजन, प्रास्ताविक आणि स्वागत अरण केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ .विलास काळे यांनी केले. शिक्षण परिषद कार्यशाळेस पं.स. कुर्डूवाडी चे गटशिक्षणाधिकारी श्री. मारुती फडके, अरण केंद्र व कुर्डूवाडी बीट मधील मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी श्री. फडके यांनी मनरेगा अंतर्गत शालेय भौतिक सुविधा, १००% दाखल पात्र विद्यार्थी, एक पद- एक वृक्ष, हरित शाळा, प्रयोगशाळा ग्रंथालय, संगणक कक्ष अद्यावत ठेवणे तसेच शिक्षणाचे गाव, विविध स्पर्धा परीक्षा, विद्यार्थ्यांची ऑनलाइन- ऑफलाईन शिक्षण या विषयांवर मार्गदर्शन केले.
डॉ. भागिरथी गिरी मॅडम यांनी ब्रिज कोर्स या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. हा कोर्स विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोचवता येईल. त्याची ध्येय, उद्दिष्टे व या प्रति शिक्षकाची भूमिका स्पष्ट करत असताना त्या म्हणाल्या की मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या शैक्षणिक अध्ययनाची उजळणी व्हावी, क्षमता, कौशल्य विकास, मागील इयत्ता अध्ययन निष्पत्ती उजळणी व नवीन शैक्षणिक वर्षात चालू इयत्तेच्या
शिकाव्या लागणाऱ्या अभ्यासक्रमाची अध्ययन निष्पत्ती, क्षमता पूर्वतयारी हा दुहेरी उद्देश ठेवून ब्रिज कोर्स तयार करण्यात आलेला आहे. विद्यार्थी सर्जनशील तेचा विकास, बोध्दिक विकास, चार सी चा विकास करणे.
पाठ्यपुस्तके ही शिक्षकांसाठी नाहीतर विद्यार्थ्यांसाठी असतात. ब्रिज कोर्स मुलांसाठी आहे. शिक्षकांनी सुलभकाच्या भूमिकेत राहावे. वय वाढेल तसे मुलांच्या आकलन क्षमता, चिंतनाचा स्तरही वाढलेला असतो. विद्यार्थ्यां पर्यंत ब्रिज कोर्स ऑनलाईन- ऑफलाईन पोहोचवावा. प्रत्यक्ष अध्ययन -अध्यापन, मार्गदर्शन करावे. अध्ययन निष्पत्ती वर आधारित सेतू अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे. आपला विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे हे शिक्षकांना चांगलेच माहित असते .या माहितीच्या आधारेच त्यांचा कृती आराखडा बनवावा. प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोचावे यासाठी कोवीड कॅप्टन, ग्रुप लर्निंग, विषय मित्र यासारखे उपक्रम राबवावेत .ब्रिज कोर्समध्ये दिलेल्या कृती प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनीच करावयाच्या आहेत .या कृती अशा दिलेल्या आहेत की त्या करताना विद्यार्थ्यांना त्यामधून आनंदच मिळेल. शैक्षणिक साहित्यासह मार्गदर्शन करावे. इतर शैक्षणिक साहित्य, पुस्तके, चित्रे, उतारे चा वापर करावा. याचाही उल्लेख मॅडमनी केला.
ब्रिज कोर्सचा उद्देश व तो कसा राबवणार याविषयी माळी वस्ती अरणच्या
शिक्षिका श्रीमती वंदना खुने, श्री. सोपान मोहिते, व्होळे येथील शिक्षक नवनाथ शिंदे, तुळशी शाळेचे शिक्षक चव्हाण दगडे, अरण शाळेच्या मुख्याध्यापिका वाघमोडे मॅडम यांनी आपले विचार मांडले.
शेवटी डॉक्टर विलास काळे यांनी ब्रिज कोर्स संदर्भात ऑनलाइन-ऑफलाईन राबवावा. कृतीपत्रिका व चाचणी सोडवून घ्याव्यात. ब्रिज कोर्स पुर्वतयारी अध्ययन स्थिती तपासणी २ री ते ८वी वर्गाची करून घ्यावी. मार्गदर्शन करून शाळांचा आढावा घेतला. श्री. प्रणीत कापसे यांनी आभार मानून कार्यशाळेची समाप्ती झाली. श्री.इंगळे, श्री.नवनाथ शिंदे, श्री.गोरख राऊत, श्री.सोपान मोहिते, श्री.दिपक काळे, श्री.संजय काशिद, श्री.संतोष भोरे यांनी तांत्रिक प्रयत्न व परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button