Pandharpur

कासेगावचे तलाठी विजय जाधव झाले मंडल अधिकारी अनेकांनी दिल्या शुभेच्छा चांगल्या कामाबद्दल केला सन्मान

कासेगावचे तलाठी विजय जाधव झाले मंडल अधिकारी अनेकांनी दिल्या शुभेच्छा चांगल्या कामाबद्दल केला सन्मान


रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील कासेगाव या ठिकाणी असणारे तलाठी भाऊसाहेब विजयकुमार जाधव यांची पदोन्नती होऊन ते मंडलाधिकारी म्हणजेच रावसाहेब झाले असल्याने कासेगांव पंचक्रोशीतील तसेच पंढरपूर तालुक्यातील व शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी पत्रकार , रफिक आतार दैनिक लोक प्रधान न्यूज चैनल दिनेश खंडेलवाल दैनिक महासत्ता व के बी न्यूज चैनल यांनी त्यांचा सन्मान केला.
तलाठी ऑफिस मध्ये सर्वसामान्यांपासून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे काम आदराने करून देणारे व प्रत्येकाला आपलेसे वाटणारे म्हणजेच कासेगाव चे तलाठी विजय कुमार जाधव होय त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वा मुळे अनेकांची मने जिंकली असून त्यांना मिळालेल्या पदोन्नती मंडल अधिकारी या पदावर बढती झाल्याने त्यांचा कासेगावातील मान्यवरांनी तसेच पत्रकारांनी सन्मान करताना तलाठी विजय कुमार जाधव यांना गहिवरून आले आपण सर्वांनी दाखवलेले प्रेम व माझा केलेला सन्मान हीच माझ्या कामाची पावती असून यापुढेही गोरगरीबां पासून तळागाळापर्यंत च्या प्रत्येक व्यक्तीचे काम आपुलकीने करून देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तलाठी कार्यालयामध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी तलाठी कार्यालयातील लिपिक तसेच गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती मान्यवर, पत्रकार उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button