Jalana

शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून घरीच जयंती साजरी करा

शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून घरीच जयंती साजरी करा
संजय कोल्हे जालना
जालना : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती दरवर्षी ३१ मे ला त्यांच्या जन्मगावी श्रीक्षेत्र चोंडी येथे मोठ्या उत्साहाने साजरी होत असते. मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ३१ मे पर्यंत महाराष्ट्रात लाॅकडाऊन असल्याने यावर्षी श्री क्षेत्र चोंडी (ता. जामखेड जि. अहमदनगर) येथे अहिल्यादेवी होळकर यांचा २९६ वा जयंती कार्यक्रम रद्द करण्यात असल्याची माहिती माजी मंत्री राम शिंदे यांनी दिलेली आहे
कोरोना महामारीमुळे गेल्यावर्षीही श्री क्षेत्र चोंडी येथे जयंती साजरी होऊ शकली नव्हती. यावर्षी तरी सर्व अहिल्या भक्त व श्रद्धाळूंनी सोमवार दि. ३१ मे २०२१ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती कोरोना महामारी असल्याने शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून घरीच जयंती साजरी करावी अशी विनंती
जिच्या हृदयामध्ये प्रेम होते आणि तीच काम तडक होते ‘अहिल्यादेवी ‘ हे त्यांचं आदराआर्थि नाव होतं.
आज स्त्रीयां साठी प्रेरणास्थान असणानी माय माऊली म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर दया,करुणा, सहनशीलता,प्रेम, दूरदृष्टी, स्नेहभावयुक्त सर्वगुण संपन्न असणारी म्हणजेच “अहिल्या माता” आज सर्वच स्त्रीयांनी त्यांना गुरूचे स्थान देऊन त्यांच्या मधील एकतरी गुण घेतला तरी मी म्हणते त्यांची पुण्यतिथी, जयंती साजरी केल्याचे सार्थक होईल असे धनगर धर्मपीठाच्या राज्यध्यक्षा
सौ.शारदा ज्ञा.ढोमणे यांनी म्हटले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button