Dindori

दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साज

दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

दिंडोरी-सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी

दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालय, अध्यापक विद्यालय, आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुल व अभिनव बालविकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
मुख्य ध्वजाचे ध्वजारोहण प्राचार्य रमेश वडजे यांच्या हस्ते तर स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहन डी एड कॉलेज च्या प्राचार्य श्रीम एम जे थेटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब जाधव, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष अनिल दादा देशमुख, आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुल समिती अध्यक्ष गुलाब तात्या जाधव, अभिनव बालविकास समिती अध्यक्ष रघुनाथ मामा गायकवाड ,सदस्य- विलास नाना देशमुख, सुभाष बोरस्ते, बी एस जाधव, बंडू भेरे, अल्ताफ शेख, छब्बू मटाले, सोमनाथ सोनवणे, राजेंद्र उखर्डे, डॉ अनिल सातपुते, मनोज ढिकले, भगवान गायकवाड, फारूक बाबा, डॉ शिल्पा देशमुख, रत्नप्रभा शेळके, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य रमेश वडजे, डी एड कॉलेज च्या प्राचार्य श्रीम एम जे थेटे, आदर्श इंग्लिश मिडीयम चे प्राचार्य डी बी ढिकले, विद्यालयाचे उपप्राचार्य एस के वाटपाडे, पर्यवेक्षक डॉ जी व्ही आंभोरे, आर व्ही मोकळ, श्रीम एन पी चौधरी ,अभिनव च्या मुख्याध्यापिका श्रीम पवार ,कॉलेज विभाग प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त विद्यालयाच्या वतीने विविध उपक्रम, स्पर्धा घेण्यात आल्या.आजचा स्वातंत्र्यदिन जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
आजच्या या शुभ दिवशी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा वाढदिवस व शिक्षकांचा व मान्यवरांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कथार यांनी तर आभार पर्यवेक्षक आर व्ही मोकळ यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक समिती, सर्व क्रीडा शिक्षक,सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

विशेष आकर्षण-
* स्वातंत्र्यदिनी परिसर तिरंगीमय दिसत होता.स्टेजवर तिरंगी फुगे, मैदानावर ध्वज ,बोर्ड यामुळे वातावरण तिरंगीमय झाले होते.
* इयत्ता ५वी ते १०वी च्या मुलींनी केशरी, पांढरा, व हिरवा या तीन रंगाच्या वर्गनिहाय मुलींनी रिबीन परिधान केल्या होत्या.
* अभिनव च्या विद्यार्थ्यांनी क्रांतिकारक, थोर समाजसेवक यांची वेशभूषा परिधान केल्याने तेही सर्वांचे आकर्षण ठरले.

फोटो – जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करतांना शालेय समिती अध्यक्ष,व प्राचार्य रमेश वडजे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button