Maharashtra

या वर्षी देखील गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा…जिल्हाधिकारी अभिजित राऊत

या वर्षी देखील गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा…जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जळगाव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी देखील गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबतचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. या मार्गदर्शक तत्वानुसार जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी कोरोना लसीकरण शिबीर, मतदार नोंदणीबाबत जनजागृती सारखे विधायक उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

सार्वजनिक गणेशोत्सव 2021 ची पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत भवनात श्री. राऊत यांच्याअध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, पोलीस अधिक्षक डॉ प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, महापालिकेचे उपायुक्त प्रविण पाटील, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष सचिन नारळे आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. राऊत म्हणाले की, यंदाचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून याबाबत मार्गदर्शक सुचनाही निर्गमित केल्या आहेत. या मार्गदर्शक सुचनांची माहिती यंत्रणेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी करुन द्यावी. त्याचबरोबर या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांनी महापालिका व स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रमाबरोबर लसीकरण शिबिराचे आयोजन करावे. त्याचबरोबर उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा या उपक्रमातंर्गत मतदार नोंदणी, आजादी का अमृत महोत्सव यासारखे उपक्रम राबवावे. त्याचबरोबर श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढू नयेत. पूजा व आरती करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक मंडळाकरीता मुर्ती 4 फुट व घरगुती गणपतीसाठी 2 फुटांच्या मर्यादेत असावी. श्रीगणेशाचे दर्शन सुविधा ऑनलाईन, वेबसाईट, फेसबुक, केबलद्वारे उपलब्ध करुन द्यावी. गणपती मंडपामध्ये निर्जतुकीकरणाच्या व्यवस्थेसह शरिरीक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम पाळले जाऊन यंदाचा गणेशोत्सव आगळ्यावेगळ्या पध्दतीने व भक्तीभावात साजरा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button