अमळनेर येथील लामा जीनला लागली आग… नगरपालिकेचे दोन बंब विझवतायेत आग…
प्रतिनिधी रजनीकांत पाटील
अमळनेर :- येथील पिंपळे रोडवरील लामा जीन येथे आज सकाळी आग लागून कापसाचे मोठे नुकसान झाले आहे.
नगरपालिकेचे दोन बंब व अग्निशामक दलाचे कर्मचारी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान ही आग कश्यामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नसून मात्र जीन मधील सर्व कापूस जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे.






