Amalner

? विप्रो तील कामगारांचेच आरोग्य धोक्यात..

? विप्रो तील कामगारांचेच आरोग्य धोक्यात…मास्क सोशल डिस्टन्स चा अभाव

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर येथे गेल्या अनेक वर्षांपासून विप्रो कंपनी कार्यरत आहे.ह्या कंपनी मध्ये साबण आणि हात धुण्याचे द्रव हँड वॉश बनविले जाते. सध्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर अति आवश्यक सेवा म्हणून अमळनेर शहरातील ही कंपनी सुरू ठेवण्यात आली आहे.या कंपनीत शेकडो कामगार काम करतात.आता सध्या सर्वत्र लॉक डाऊन सुरू असूनही ही कंपनी सुरू ठेवण्यात आली आहे. परंतु येथे काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य मात्र धोक्यात आहे.सुरक्षित अंतर,मास्क उपलब्ध नसणे,एकत्रित अनेक तास बसवून ठेवणे,कारण आणि काम नसताना कामगारांना तासनतास वेठीस धरणे इ या कामगारांच्या संदर्भात तक्रारी मिळाल्या आहेत.तसेच आंध्र प्रदेश आणि इतर राज्यात प्रॉडक्ट् ,साबण सप्लाय केले जातात.

तसेच बाहेरील राज्यातून ट्रक द्वारे ड्रायव्हर आणि क्लिनर देखील येतात.त्यांच्या पण चाचण्या होणे आवश्यक आहे. कारण दळण वळण वाहतूक करत असताना प्रवास करत असताना अनेक लोकांशी त्यांचा संबंध येत असतो .ही काळजी घेतली जात नसून ट्रक्स मध्ये माल भरून रवाना केला जात आहे.

तरी विप्रो प्रशासन आणि उपविभागीय प्रशासन,पोलीस प्रशासन इ नी याबाबत गांभीर्याने विचार करावा आणि या कामगारांना सुरक्षित होण्यास मदत करावी अशी मागणी होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button