Delhi

?Big Breaking..केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा, 2 वर्षात देश होणार  टोलनाक्यापासून मुक्त ..!

?Big Breaking..केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा, 2 वर्षात देश होणार टोलनाक्यापासून मुक्त ..!

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी देशभरातील टोलनाक्यांबद्दल मोठी घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की २ वर्षांत भारत पूर्णपणे टोलनाकेमुक्त करण्यात येईल. यामुळे पूर्ण देशभरात वाहने कोणत्याही अडथळ्यांशिवाय ये-जा करू शकतील. एसोचॅमच्या कार्यक्रमात बोलताना नितिन गडकरी म्हणाले की लवकरच रशियाच्या सरकारच्या मदतीने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस) शेवटच्या टप्प्यात आणली जाईल ज्यानंतर २ वर्षांत भारत पूर्णपणे टोलनाकेमुक्त होईल.

यानंतर कसा वसूल केला जाणार टोल

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले, ‘यानंतर टोल थेट बँकेतील खात्यांमधून वजा करण्यात येतील. हे पैसे वाहनांच्या हालचालींवरून घेतले जातील. आता सर्व कमर्शियल वाहने वेहिकल ट्रॅकिंग सिस्टिमसह येतात, तर जुन्या वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्यासाठी सरकार काही योजना घेऊन येईल.’ ही घोषणा करताना गडकरी म्हणाले की यामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे टोलचे उत्पन्न ५ वर्षांत १.३४ ट्रिलियन इतके वाढेल. हे जीपीएस प्रणालीच्या वापरामुळे घडेल. यामुळे लेनची पारदर्शकताही येईल आणि कॅशलेस व्यवहारांना चालना मिळेल.

नफाखोरीबद्दल दिला इशारा

एसोचॅम फाऊंडेशन वीक २०२०ला व्हर्चुअली संबोधित करताना नितिन गडकरींनी स्टीलनिर्मिती करणाऱ्यांना नफेखोरीबद्दल इशारा दिला. ते म्हणाले की त्यांनी मुख्य कंपन्यांकडून गेल्या सहा महिन्यात स्टीलच्या किंमतीत ५५%नी वाढवली गेल्याच्या गोष्टीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष वेधले आहे आणि यामुळे काही प्रकल्प पूर्ण करणे अवघड होत आहे. रस्ते परिवहन, राजमार्ग आणि एमएसएमई मंत्री गडकरी पुढे म्हणाले की जर कंपन्या यावर अंकुश लावण्यात अपयशी ठरल्या तर सरकारला आपल्या धोरणांमध्ये बदल करावे लागतील आणि प्रकल्पांमध्ये वैकल्पिक उद्योगांना प्रोत्साहन द्यावे लागेल.

याआधीही सिमेंट निर्मात्यांना दिला आहे इशारा
नितिन गडकरी यांनी याआधीही सिमेंट निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना अंतर्गत लागेबांधे करण्यावरून इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले, ‘स्टील आणि सिमेंट निर्मात्यांसाठी एका दीर्घकालीन धोरणाची गरज आहे. एक समान धोरण.’ सोबतच त्यांनी म्हटले की किंमतींमध्ये १५-२०% वाढ योग्य मानली जाऊ शकते, पण सध्या हे फार जास्त आहे. त्यांनी म्हटले की उत्पादक उत्पादन वाढवून नफा कमावू शकतात, अन्यथा हे प्रकल्प अव्यवहारिक होतील.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button