Karnatak

Breaking:अजून एक लैंगिक शोषण करणारा साधू..? अल्पवयीन मुलींचे शोषण केल्या प्रकरणी पुजाऱ्याला शिक्षा..!

Breaking:अजून एक लैंगिक शोषण करणारा साधू..? अल्पवयीन मुलींचे शोषण केल्या प्रकरणी पुजाऱ्याला शिक्षा..!
कर्नाटकातील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी श्री मुरुघ मठाचे (Murugha Math) मुख्य पुजारी शिवमूर्ती मुरुघ शरणारू (Shivamurthy Murugha Sharanaru) यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. अटकेनंतर शिवमूर्ती मुरुघ यांना चित्रदुर्गच्या जिल्हा कारागृहात १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. आता त्यांची चौकशी करता यावी, यासाठी पोलीस त्यांना रिमांडवर घेण्याची मागणी न्यायालयात करणार आहेत. मात्र छातीदुखीची तक्रार केल्याने शिवमूर्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याआधी मंगळवारी चित्रदुर्गच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने मुरुघ मठाचे मुख्य पुजारी शिवमूर्ती मुरुघ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर स्थगिती दिली होती. त्यांच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात दाखल एफआयआरनुसार, महंत शिवमूर्ती यांनी पीडित मुलींचे दोन वर्षांहून अधिक काळ लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.

शिवमूर्ती मुरुघ केसशी संबंधित १० महत्त्वाचे मुद्दे

शिवमूर्ती मुरुघ शरणारू हे कर्नाटकातील मुरुघ मठाचे मुख्य महंत आहेत. हा मठ प्रमुख लिंगायत मठांपैकी एक आहे.

दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO), अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार) आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत शरणारुंच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हैसूर आणि चित्रदुर्गातील सामाजिक संघटनांनी केलेल्या मोठ्या आंदोलनांनंतर महंतांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर, शिवमूर्ती मुरुघ यांना दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले, तिथे त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

एफआयआर दाखल झाल्यानंतर सात दिवसांनी महंतांना अटक करण्यात आली. अटक टाळण्यासाठी शरणारु यांनी अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती, ती फेटाळण्यात आली. आताही त्यांनी छातीदुखीचे कारण सांगून हॉस्पिटलची वाट धरली आहे.

या प्रकरणात महंत यांच्याशिवाय आणखी पाच जण आरोपी आहेत. मठाच्या वसतिगृहाच्या वॉर्डनचा समावेश आहे.

जानेवारी २०१९ ते जून २०२२ या कालावधीत मठ संचलित शाळेत शिकणाऱ्या आणि वसतिगृहात राहणाऱ्या १५ आणि १६ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे.

गेल्या महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांसह चित्रदुर्गातील मुरुघ मठाला भेट दिली होती. येथे राहुल गांधींनाही लिंगायत समाजाची दीक्षा देण्यात आली होती.

मुरुघ मठ ही एक प्रभावी संस्था म्हणूनही ओळखली जाते. येथे भेट देणाऱ्या राजकीय नेत्यांची यादी भलीमोठी आहे.

२०२० मध्ये, जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांची उचलबांगडी होण्याची चर्चा होती, तेव्हा मुरुघ मठाचे शिवमूर्ती हे येडियुरप्पा यांना जाहीरपणे पाठिंबा देणाऱ्या पहिल्या धार्मिक नेत्यांपैकी एक होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button