Pune

?Big Breaking.. पुण्यात सॅनिटायझर कंपनीला आग..7 जणांचा मृत्यू.. अजूनही काही मजूर कंपनीत अडकून..!

?Big Breaking.. पुण्यात सॅनिटायझर कंपनीला आग..7 जणांचा मृत्यू.. अजूनही काही मजूर कंपनीत अडकून..!

पुणे पुण्यातल्या उरवडे जवळ एसव्हीएस कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कंपनीत 15 ते 20 कामगार अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. एसव्हीएस कंपनीत सॅनिटायझर बनवण्याचं काम सुरु होतं.

मुळशी तालुक्यातील लावासा रोडवर उरवडे गावाच्या जवळ सॅनिटायझर बनवणाऱ्या SVS aqua technologies कंपनीला आग लागली आहे. एक तासापूर्वी प्रचंड मोठी आग लागली आहे. 15 ते 20 मजूर या कंपनीमध्ये अडकलेल्या आहेत. यामध्ये बऱ्याच महिलांचा देखील समावेश आहे.

या ठिकाणी तहसीलदार अभय चव्हाण आणि पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ हे त्या कंपनीच्या परिसरात पोचलेले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फायर ब्रिगेडच्या 3 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत
5 ते 6 ऍम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. आत मध्ये अडकलेल्या मजुरांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु आता आग आटोक्यात येण्याच्या पलीकडे गेलेली आहे त्यामुळे आत अडकलेल्या मजुरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या परिसरामध्ये प्रचंड धुराचे लोट निघत असून चार किलोमीटर पासून हे दोराचे लोट दिसत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button