Pune

?Big Breaking…संजय राठोड यांना मोठा धक्का..खासदार गिरीश बापट यांच्या सुनेकडून पोलिसात तक्रार दाखल

?Big Breaking…संजय राठोड यांना मोठा धक्का..खासदार गिरीश बापट यांच्या सुनेकडून पोलिसात तक्रार दाखल

पुणे : गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यभर चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत आहेत. यामध्ये शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडलं जात आहे. मात्र संजय राठोडांनी या प्रकरणावर आपलं मत व्यक्त करताना सर्व आरोप फेटाळून लावले होते. परंतू सोशल माध्यमांवर ऑडिओ क्लिप आणि फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे भाजपने हे प्रकरण लावून धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार गिरीष बापट यांच्या सून स्वरदा बापट यांनी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
7 फेब्रुवारीला पूजा चव्हाण या युवतीने हेवन पार्क, लेन नं 10, वानवडी, पुणे येथे इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली.
पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद केली. त्यानंतर संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांच्या संभाषणाच्या 12 ऑडिओ क्लिप सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या. या क्लिपमधून ऐकण्यात येतं राठोड यांनी पूजा चव्हाणच्या मृत्युनंतर प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी अरूण राठोडला सांगितलं असल्याचा आरोप स्वरादा यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
या क्लिपमधून समजतं की संजय राठोड यांचे पूजा चव्हाणशी संबंध होते. त्यातून असं निष्पन्न होतं की सतत होणाऱ्या मानसिक त्रासाला, प्रेमभंग किंवा त्यांच्याकडून होणाऱ्या दबावाला आणि छळाला कंटाळून पूजाने आत्महत्या केल्याचं स्वरदा बापट यांनी तक्रारीमध्ये म्हटलं आहे. तर या प्रकरणात संजय राठोडांकडून होणाऱ्या छळाला आणि दबावाला कंटाळून पूजाला आत्महत्या करण्यास प्रेरित केलं आणि या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यास आदेश दिले, त्यामुळे गुन्हा कलम 306 आणि 107 यावरून एफआयआर नोंद करून घ्यावा आणि पुढील कारवाई करावी, अशी मागणी स्वरदा बापट यांनी केली आहे.
दरम्यान, कुणीही तक्रार करण्यास पुढे येत नसल्यानं पोलिसांनी या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल केला नव्हता. पोलिसांनी स्वत: सुमोटो अधिकार वापरुन गुन्हा दाखल करावा, अशी भाजपची भूमिका होती. मात्र पोलीस या प्रकरणात फक्त बघ्याची भूमिका घेत असल्यानं अखेर स्वरदा बापट स्वत: पुढे आल्या आहेत, त्यांनी संजय राठोड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे, आतातरी पुणे पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखव करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button