Bhusawal

भुसावळ भाजपाचे यश हे गावापासून दिल्लीपर्यंत कार्यरत असलेले विविध क्षेत्रांतील, जाती-समुदायांतील लाखो कार्यकर्त्यांचे आहे – खासदार रक्षाताई खडसे

भुसावळ भाजपाचे यश हे गावापासून दिल्लीपर्यंत कार्यरत असलेले विविध क्षेत्रांतील, जाती-समुदायांतील लाखो कार्यकर्त्यांचे आहे – खासदार रक्षाताई खडसे

विनोद जाधव भुसावळ

bhusaval : आज भुसावळ तालुका व शहर मंडळाचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन वरणगाव येथील नागेश्वर मंदिर येथे जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे, खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजयभाऊ सावकारे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी जिल्हा अभ्यासवर्ग प्रमुख माजी जिप सभापती पोपटतात्या भोळे, नगराध्यक्ष सुनील काळे, पंस सभापती मनीषाताई पाटील, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, पंस सदस्य प्रितीताई पाटील, पंस सदस्य वंदनाताई उन्हाळे, सरचिटणीस दिलीप कोळी, सर्व नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

विचारधारा कोणतीही असो राजकीय पक्षांमध्ये नवे कार्यकर्ते मिळविण्याची व त्यांना प्रशिक्षित करण्याची व्यवस्था असावी लागते. भाजपचे यश हे गावापासून दिल्लीपर्यंत कार्यरत असलेले विविध क्षेत्रांतील, जाती-समुदायांतील लाखो कार्यकर्त्यांमुळे आहे. येत्या काळात अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेत अधिक यश मिळवण्यासाठी कार्यकर्ते मिळविणे, संघटनबांधणी करणे, लोकसंपर्क वाढविणे यावर भर द्यावा लागेल.
भाजपाचे यश हे गावापासून दिल्लीपर्यंत कार्यरत असलेले विविध क्षेत्रांतील, जाती-समुदायांतील लाखो कार्यकर्त्यांचे आहे हेही लक्षात घेतले पाहिजे. यात भाजपसाठी पडद्यामागे राहून पूर्णवेळ कार्य करणारे प्रचारक, स्वयंसेवी वृत्तीने स्वखर्चाने कार्यरत असलेले, आपापल्या कार्यक्षेत्रात अत्यंत यशस्वी असलेले व आवश्यक तेव्हा पक्षाला सर्वप्रकारची मदत करायला तयार असलेले, असे सर्व प्रकारचे हजारो कार्यकर्ते आहेत. हे एवढे कार्यकर्ते भाजपने प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून तयार केले.

नवे कार्यकर्ते मिळविणे, त्यांचे प्रशिक्षण करणे, त्यांना विविध जबाबदाऱ्या सोपवून व वेळप्रसंगी निर्णयाचे स्वातंत्र्य देवून त्यांच्यातील नेतृत्वाचे गुण विकसित करणे, निवडणुकांच्या माध्यमातून त्यांना संधी देणे, निवडून येण्यास मदत करणे, निवडून आल्यास सत्तेची छोटी मोठी पदे देऊन कार्यकर्त्याला एक समर्थ नेता म्हणून घडविण्याची प्रक्रिया भाजपच्या वतीने गेली अनेक वर्षे राबविली जात आहे. असे प्रतिपादन खासदार रक्षाताई खडसे यांनी यावेळी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button