Bhusawal

भुसावळ विभागीय निरीक्षक सुजित कपाटे यांच्या पथकाची अवैध मद्य तस्करी विरोधात खिर्डीत कारवाई..

भुसावळ विभागीय निरीक्षक सुजित कपाटे यांच्या पथकाची अवैध मद्य तस्करी विरोधात खिर्डीत कारवाई..

१,१७,२२० रु.किमतीचा अवैध मद्यसाठा जप्त.

खिर्डी प्रतिनिधि :- प्रविण शेलोडे

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त श्री.कांतीलाल उमाप संचालक अं.व दक्षता श्रीमती उषा वर्मा मॅडम, तसेच विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग,श्री.अर्जुन ओहोळ व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव श्रीमती. सिमा झावरे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली विभागीय निरीक्षक श्री. सुजित ओं कपाटे, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ, यांच्या पथकास मिळालेल्या खात्रीशीर गुप्त बातमी नुसार दिनांक ०८/०३/२०२२ रोजी रावेर तालुक्यातील खिर्डी या ठिकाणी छापा टाकुन देशी दारुची अवैधरित्या विक्री करतांना एकुण ०२ आरोपी विरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आलेले असून त्यात देशी दारुचे एकूण ४० बॉक्स असा एकूण रु. १,१७,२२०/- किंमतीचा दारुबंदी गुन्ह्यातील मुद्येमाल आरोपीत इसम नामे १) कुलदिप भागवत जैस्वाल आणि २) जितेंद्र रमेश जैस्वाल यांचे ताबे कब्जातून जप्त केला. व त्यांचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमाअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. सदर अवैध मद्यसाठा मिळून आल्याने मोठ्या प्रमाणात मद्य तस्करांची टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे याबाबत तपास सुरू आहे.
सदर कारवाई विभागीय निरीक्षक श्री. सुजित ओं. कपाटे, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ, श्री. राजेश निं. सोनार, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ, श्री. सत्यविजय ठेंगडे, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, यावल तसेच विभागिय निरीक्षक पथकाचे जवान नि वाहनचालक सागर क. देशमुख, सहा. दुय्यम निरीक्षक, मधुकर वाघ जवान नितीन पाटील, विठ्ठल हाटकर यांनी यशस्वी रित्या पार पाडली. सदरील गुन्हयाचा पुढील तपास विभागीय उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, श्री. अर्जुन ओहोळ आणि अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव श्रीमती सिमा झावरे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क, विभागीय निरीक्षक श्री. सुजित ओ. कपाटे करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button