Bhusawal

नाहाटा महाविद्यालयात कृष्णा सोबती यांची जयंती साजरी

नाहाटा महाविद्यालयात कृष्णा सोबती यांची जयंती साजरी

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

: – भुसावळ कला, विज्ञान आणि पु . ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालय च्या मानव्यविद्या शाखे अंतर्गत हिंदी विभागातर्फे महिला साहित्यकार कृष्णा सोबती यांची जयंती साजरी करण्यात आली . कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून चाळीसगाव येथील बी . पी . आर्टस् , एस .एम . ए .विज्ञान ,के .के . वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख प्रा . डॉ . सुनिता कावळे या होत्या .तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ . ए. डी . गोस्वामी होते . यावेळी अध्यक्षस्थानावरून उपप्राचार्य डॉ . ए . डी .गोस्वामी म्हणाले की हिंदी साहित्यातील महिला साहित्यकार कृष्णा सोबती यांच्या हिंदी साहित्यात फार मोठे योगदान आहे . त्यांच्या साहित्यातून सामान्य व्यक्तीच्या संवेदना व्यक्त होतात तर प्रमुख पाहुणे प्रा .डॉ . सुनिता कावळे यांनी हिंदी साहित्यात कृष्णा सोबती यांचे व्यक्तित्व आणि कृतित्व यावर सखोल मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख प्रा . डॉ . मनोज पाटील यांनी केले . तर पाहुण्यांचा परिचय हिंदी विभागाचे प्रा .डॉ . राजेंद्र तायडे यांनी करून दिला . प्रा . कविता पांडव यांनी सूत्रसंचालन केले . यावेळी प्राध्यापक , विद्यार्थी , ऑनलाईन उपस्थित होते . प्रा . डॉ . प्रियांका महाजन यांनी आभार व्यक्त केले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button