रावेरात 14 जुलैपासून सात दिवसांचा जनता कर्फ्यू
प्रतिनिधी रजनीकांत पाटील
रावेर :-शहरासह तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता 14 जुलैपासून ७ दिवसांचा जनता लॉकडाऊन पाळण्यात यावा अशी मागणी नगराध्यक्षासह सर्व नगरसेवकांनी प्रशासनाकडे केली आहे.तसेच तहसीलदार उषारानी देवगुणे यांनी जनता कर्फ्युला मान्यता दिली आहे.
रावेरसह तालुक्यात कोरोनाचे वाढती रुग्णसंख्या पाहता जळगाव, अमळनेर भुसावळ या शहरांमध्ये जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्याच प्रकारचा जनता कर्फ्यू रावेरात सुद्धा १४ जुलै पासून सात दिवसांसाठी लावण्यात यावा अशी मागणी आज रावेर नगरपालिकेतर्फे करण्यात आली असून या मागणीला तहसीलदार उषारणी यांनी मान्यता दिली आहे. या निर्णयाने रावेरात कोरोनाचे रुग्ण कमी होतील अशी आशा सामान्यांना आहे.






