Aurangabad

लाचेच्या रकमेचा चेक घेताना बँकेचा वसुली एजंट ताब्यात

लाचेच्या रकमेचा चेक घेताना बँकेचा वसुली एजंट ताब्यात

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : मंजूर झालेले दहा लाख रुपये कर्ज खात्यात जमा करण्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी करुन 80 हजार रुपयांचे धनादेश घेणाऱ्या बॅंकेच्या वसुली एजंटला सीबीआयने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. सुरेश भालेराव असे आरोपीचे नाव आहे. त्याला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोन दिवस सीबीआय कोठडी ठोठावली आहे.

तक्रारदाराने मंडप डेकोरेशनच्या व्यवसायासाठी पंतप्रधान स्वयरोजगार योजेनेनतर्गत १० लाख रुपये कर्ज मिळविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे २०१८ मध्ये फाईल दाखल केली होती. त्यांची फाईल पुढील कार्यवाहीसाठी शहरातील पैठणगेट येथे युनियन बॅंकेची शाखेकडे गेली. तेव्हापासून ते बॅंकेत चकरा मारत होते. मात्र, त्यांच्या फाईलविषयी कोणीही त्यांना समाधानकारक माहिती त्यांना देत नव्हते. दरम्यान, एके दिवशी ते बॅंकेतून बाहेर पडले तेव्हा बॅंकेचा अधिकृत वसुली एजंट भालेराव भेटला.

त्याने तुझी कर्जाची फाईल बॅंकेचे व्यवस्थापक जयप्रकाश झा यांच्या टेबलवर आहे. त्यांना खूश करण्यासाठी पैशाची मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत थेट सीबीआयकडे तक्रार केली. तक्रार प्राप्त होताच सीबीआयने पैठणगेट येथील बॅंकेच्या समोर सापळा रचला. यावेळी तक्रारदार यांनी त्यांच्याकडे रोख रक्कम नसल्याचे आरोपीना सांगितले असता आरोपी भालेरावने त्यांना ५० हजार रुपये आणि ३० हजार रुपये असे वेगवेगळ्या रकमेचे बेअरर धनादेश देण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून धनादेश घेताच सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी भालेरावला रंगेहाथ पकडले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button