Dondaicha

अनेकांच्या जीवावर उठलेल्या, अग्रसेन पतपेढीचा दीड कोटीत लिलाव…

अनेकांच्या जीवावर उठलेल्या, अग्रसेन पतपेढीचा दीड कोटीत लिलाव…

ठेवीदारांना अंधारात ठेवून लिलाव, पंचवीस पेपर गावात येत असलेल्या दैनिकाला जाहिरात-वरुन पेपरही गहाळ…

दोडांईचा- मागील वीस वर्षापुर्वी शहरात खुप कमी वेळात नावारूपाला आलेली श्री अग्रसेन पतसंस्थाने अल्पावधीतच जनतेला जादा व्याजाचे आमीश दाखवत ,गोरगरीब, मध्यम वर्गीय, श्रीमंतांच्या करोडोच्या ठेवी स्विकारत. धनदांडग्यांना कर्ज देत. एकेदिवशी दिवाळे काढत,अनेकांचे उज्वल भविष्य, संसार, लग्न मोडकळीस आणून,अनेक गोरगरिबांच्या जिवावर उठलेल्या,अशा विश्वासघातकी श्री अग्रसेन पतपेढीचा आज चौथ्यांदा गावात पाच पंचवीस पेपर येत असलेल्या दैनिकात जाहीर लिलावाची जाहिरात देत. बसस्टँडहून पेपर गहाळ करत, फक्त बारा बोली लावणार्यांना बोलवत, एक कोटी एक्केचाळीस लाख रूपयाला इमारत विक्री जाहीर करण्यात आली. त्यामुळे लिलावाच्या ह्या रखमेतुन ठेवीदारांचे काय? प्रत्येकाला आपला हक्काचा पैसा मिळेल की नाही? मिळेल तर कधी मिळेल? कोणाकोणाला मिळेल? किती मिळेल? त्याचे निकष कसे असतील? मे. कोर्ट जनतेची उघड्या डोळ्यांनी झालेली फसवणुकीची दखल घेतील की नाही? शासनस्तरावर कोणी दखल घेईल की नाही? असे एकना अनेक प्रश्न ठेवीदार ग्राहकांनमध्ये उपस्थित होत,इतर लिलावासारखा हा लिलाव पण फेल जाईल ,अशीच शंका पैसे मिळण्याची आस लावून बसलेल्या हजारो ठेवीदारांमध्ये बोलली जात आहे.

आजपासुन वीस बावीस वर्षापुर्वी धुळ्यात मेन शाखा असलेल्या अग्रसेन पतसंस्थेने दोडांईच्यात ठराविक, आर्थिक व व्यवसायत बलाढ्य असलेल्या लोकांना हाताशी घेत,शहरातील लोकांची दैनंदिन आर्थिक आवक व गरज लक्षात घेत. गावात भाड्याच्या जागेवर शाखा सुरु केली. त्यावेळी बँकेत आलेल्या प्रत्येक ग्राहकाला इतर बँकेपेक्षा आपली बँक कसे जास्तीचे व्याज देते हे आमीश दाखवत .गावातील लोकानांच कामावर ठेवत .जनसामान्यांचा विश्वास संपादन करत करोडोच्या ठेवी स्विकारत .कमी वेळात व्यवसायाची झगमगाट दाखवली. त्यानंतर गावातच मेन ठिकाणी पतसंस्थेसाठी जागा निवडत इमारत बांधली. त्यामुळे पतसंस्थेवर लोकांचा विश्वास आणखी वाढत गेला. जो नाही तो, शहर व परिसरातील गोरगरीब, व्यवसायिक, शेतकरी मुदत ठेवीला अग्रसेन पतसंस्थेत इतर पतसंस्था पेक्षा जास्त व्याज मिळते. म्हणून आपल्या कष्टाची कमविलेली पुंजी, पोरांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी व्यवसायासाठी जोडलेले दोन पैसे पतसंस्थेत एफ.डी.मध्ये ठेवत होते. याप्रकारे बँकेने गावातील ठराविक लोकांना हाताशी धरत गोरगरीब, मध्यमवर्गीयांचा करोडो रूपये गोळा करत. एकदिवशी दिवाळखोरी काढली.

अग्रसेन पतसंस्थेने अचानक काढलेल्या दिवाळखोरीमुळे अनेकांना अचानक धक्का बसला. स्थानिक पतसंस्था संचालक मंडळ, मँनेजर, कर्मचारी यांनी ठेवीदारांना ठेवीचे पैसे देण्यास फिरवाफिरव चालू केली व हळूहळू पैसे परत करण्यास असमर्थता दर्शवली. काहींनी सुरूवातीला याचे पाय पळ, त्याचे पाया पळ सुरू केले. काहींनी धुळे गाठले. काहींनी कोर्टोची पायरी चढली. काहींनी पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या. पण आजपर्यंत त्याचा प्रभावी इलाज झाला नाही. म्हणून ह्या अग्रसेन पतसंस्थेने अनेकांचे स्वप्न भंग केले.कोणाचे घर बाधांयचे स्वप्न भंग केले. कोणाची नोकरी गेली. कोणाचे लग्न मोडले.कोणाची योग्य वेळी, योग्य उपचारा अभावी मरण पत्कारावे लागले, असे एक नाही तर अनेकांच्या आयुष्यांची राखरांगोळी करत. प्रत्येकाला भिकार्यासारखे रोडावर कटोरा घेऊन उभे करत,आपलेच पैसे मागायची नौबत ह्या पतसंस्थेने आणून ठेवली आहे.

आज ह्या पतसंस्थेचा शासनाने मे. कोर्टाच्या आदेशाने जाहीर लिलाव करण्याचे ठरवत ,लोकांनी जास्तीत जास्त बोली लावावी. म्हणून वर्तमान पत्रात जाहीरात देत आवाहन करण्यात आले. म्हणून ठेवीदारामंध्ये वरील प्रश्न निर्माण होत असून मा.जिल्हाधिकारी सो. यांनी स्वतः लक्ष घालून गोरगरीब जनतेचा घाम गाळत कष्टाने कमविलेला पै-पै पैसा कोणत्याही परिस्थितीत परत करायला पाहिजे. तसेच सहकारातुन गोरगरिबांच्या घरात दरोडा टाकत ,त्यांचे पैसे घेऊन फक्त कागद देत, फसवणूक करणार्यांची प्राँपर्टी सील व विक्री करत, जेलमध्ये टाकायला पाहिजे, असा सुर पंधरा ते वीस वर्षांपासून आर्थिक फसवणूक झालेल्या गोरगरीब ठेवीदारांमधुन निघत आहे.

*असा झाला, अग्रसेन पतसंस्थेचा दीड कोटीत लिलाव….

अनेक वर्षोपासुन दोडांईचाकरांची फसवणूक केलेल्या अग्रसेन पतसंस्थेच्या मुख्य बाजारपेठेतील इमारतीच्या लिलावाची जाहिरात दिनांक २८ आँक्टोबंर रोजी ज्या वर्तमान पत्राचे वीस पंचवीस पेपर मोठ्या मुश्कीलने गावात येतात, अशा पेपरला मुद्दाम जाहीरात देण्यात आली. जसे गावात इतर कोणतेही जास्त खप असलेले दैनीक नव्हते. म्हणून हा दैनिक सकाळीच स्टालवरून गहाळ करण्यात आला. मात्र तरीही अग्रसेन पतसंस्था इमारत विक्री उद्या होत असल्याची वार्ता हळूहळू गावात शिरली.दिनांक २९ रोजी सकाळी अनेकांनी तहसील कार्यालय गाठत, डिपाँझीट भरली. तर काहींनी लिलावाच्या ठिकाणी धावुन येत,डिपाँझीट भरली. यावेळी लिलावात गावातील बारा लोकांनी सहभाग घेतला होता. त्यात श्री महेश रेलूमल कुकरेजा,श्री गिरधारी नानकराम रूपचंदानी, श्री बलराम हरीशलाल कुकरेजा, श्री भटू आनंदा पाटील, श्री नानाभाऊ नामदेव मराठे, श्री डॉ. सचीन सोहनलाल पारख, श्री सुंदरलाल शकंरलाल चैनानी, श्री दिनेश रजनीकांत बोरा, रवीराज ज्ञानेश्वर भामरे, श्री रमेश भिला कोळी, श्री शिवराज ज्ञानेश्वर भामरे, श्री रामसिंग दौलत ठाकूर आदींनी सहभाग घेतला. मोजक्या पण खेळीमेळीच्या वातावरणात जास्त गर्दी न करता,उपस्थित श्री बलराम हरेश कुकरेजा यांनी एक कोटी एक्केचाळीस लाखाची सर्वात जास्त बोली लावत तीन वार करण्यात आले. यावेळी शासनस्तरावर लिलावाची बोली मा. अप्पर तहसीलदार, दोडांईचा पोलीस स्टेशनचे इनचार्ज प्रोबेन्शरी एसपी, तलाठी शास्री आप्पा व इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button