Aurangabad

मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर एका युवकाने चिरला स्वत:चा गळा

मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर एका युवकाने चिरला स्वत:चा गळा

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर एकाने आपल्या पत्नीसमोरच धारदार शस्त्राने स्वत:चा गळा चिरल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच शेजारच्या नागरिकांनी धाव घेतली. या घटनेनंतर आसपासच्या नागरिकांनी जखमी युवकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

सविस्तर माहिती अशी की,
भाऊसाहेब काकडे याचे काही दिवसांपूर्वी राणी काकडे (वय 23 वर्षे) या युवतीसोबत विवाह झाला होता. लग्नानंतर पहिले सहा महिने दोघांत सर्वकाही अलबेल सुरू होते. पण त्यानंतर दोघांमध्ये छोट्या छोट्या कारणांतून वादाला सुरुवात झाली. दिवसेंदिवस वाद वाढतच गेला. पुढे वाद वाढतच गेले. एकमेंकासोबत सततच्या होणाऱ्या वादाला कंटाळून दोघांनी सोमवारी बाँडवर घटस्फोट घेतला.

बाँडवर घटस्फोट घेतल्यानंतर दोघेही सोबत मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आले. याठिकाणी दोघांत पुन्हा वादाला सुरुवात झाली. यावेळी राग अनावर झाल्यामुळे भाऊसाहेब याने धारदार शस्त्राने स्वत: चा गळा चिरून घेतला. या घटनेत भाऊसाहेब हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button