Dhule

Amazing: हया जिल्ह्यात स्त्रिया दारू पिण्यात पुरुषांपेक्षा पुढे..!अहवालात समोर आली आकडेवारी..!

Amazing: हया जिल्ह्यात स्त्रिया दारू पिण्यात पुरुषांपेक्षा पुढे..!अहवालात समोर आली आकडेवारी..!

Dhule नेहमी असेच मानले जाते की, स्त्रियांपेक्षा पुरुष अधिक मद्यपान करतात. मद्यपानाचा विषय निघाला की पुरुषच आघाडीवर असतात असा सर्वांचाच समज आहे, मात्र राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालानुसार राज्यातील धुळे जिल्ह्यातील महिला सर्वाधिक मद्यापी महिला म्हणून अव्वलस्थानी असल्याचा धक्कादायक अहवाल नुकताच समोर आला आहे.
तरुणी व महिलांच्या मद्यव्यसनामध्ये राज्यात धुळे जिल्हा (३८.२ टक्के) तर पुरुषांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा (३४.७ टक्के) प्रथम क्रमांक लागतो. मद्यपानामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होत असून अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. परंतु, मद्यविक्रीतून येणारा महसूल बघता राज्य आणि केंद्र सरकारच मद्य विक्रीला प्रोत्साहन देत असल्याचे चित्र देखील समोर आले आहे. त्यामुळे राज्यात मद्यप्राशन करणाऱ्यांची संख्या गेल्या तीन वर्षांत दुपटीने वाढली असून सर्वाधिक मद्यपी महिला धुळे जिल्ह्यात तर पुरुष गडचिरोली जिल्ह्यात आहेत. ही धक्कादायक माहिती राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालातून नुकतीच समोर आली आहे.

महिलांमध्ये धुळ्यानंतर गडचिरोली, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असूनही तिथे व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक असल्याचे या अहवालातून उघड झाले आहे.

सामाजिक कार्यकर्ते गावोगावी जाऊन दारूबंदी व्हावी यासाठी कार्य करत असतात. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात फिरताना संपूर्ण धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात दारूबंदी व्हावी यासाठी धुळे जिल्हातून पहिली दारूबंदी चळवळीची सुरूवात झाली आहे. धुळे जिल्हात तरुणांचे व्यसनाधीन होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात दारूबंदी करा, ही महाराष्ट्र दारूबंदी करा अशी सर्व फ्रंट चया महीला/युवा मोर्चा ची आग्रही मागणी आहे.
गेल्या सहा वर्षांपासून जिल्हात जन जागृती प्रबोधन सुरू आहे. कारण दारूबंदी चळवळ ही महिलांना दारू पिणाऱ्यांचा खूप त्रास होतो, त्यांचे संसार उध्वस्त होत आहेत. तसेच तसेच तरुणपिढी व्यसनमुक्त व्हावी यासाठी महीलांनी दारू बंदी संदर्भात चळवळ सुरू केली आहे. परंतु जिल्ह्यात जर नागरी भागातील सधन क्षेत्रातील महिला किंवा कॉलेजच्या मुलींच्या किंवा आदिवासी भागातील महिलांच्या संदर्भात असे व्यसनाधिनतेचे वाढते प्रमाण जर अशा अहवालातून समोर आले असेल तर ही धुळे जिल्हासाठी अत्यंत धक्कादायक गंभीर बाब आहे, असे त्या म्हणाल्या.

यासाठी वेळेत व्यसनमुक्तिसाठी पाऊले उचलली न गेल्यास व धुळे जिल्हात दारूबंदी न झाल्यास भविष्यात जिल्ह्यात पुरूषांप्रमाणे महिलांच्या आरोग्याबाबत अतिशय भयानक परिस्थिती निर्माण होईल. परंतु या अहवालानुसार धुळे जिल्ह्यातील महिलांसाठी ही बाब अतिशय गंभीरतेने विचार करायला लावणारी आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button