Amalner

अमळनेरचे राकेश पाटील यांची आत्मनिर्भर भारत च्या जिल्हा संयोजक पदी व चार सह संयोजकाच्या नियुक्त्या करण्यात आल्या….

अमळनेरचे राकेश पाटील यांची आत्मनिर्भर भारत च्या जिल्हा संयोजक पदी व चार सह संयोजकाच्या नियुक्त्या करण्यात आल्या….

अमळनेर: भारतीय जनता पार्टी,जळगाव जिल्हा ग्रामीण च्या आत्मनिर्भर भारत अभियानासाठी अमळनेर चे राकेश पाटील यांची संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच सागर भारंबे(रावेर),गिरीश वराळे(शिरसोली),मिलिंद वाणी(चोपडा),योगेश महाजन(धरणगाव) यांच्या जिल्हा सहसंयोजक पदी नियुक्त्या करण्यात आल्या.भारतीय जनता पार्टी जळगांव ग्रामीण तर्फे यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.राकेश पाटील व चारही सहसंयोजक यांनी या पूर्वी भारतीय जनता पार्टीच्या अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत.आंदोलने असो अथवा निवडणूक काळातील कामे त्यांनी यशस्वीपणे पूर्णत्वास नेलित.सदर निवड ही त्यांच्या आतापर्यंतच्या कामाची दिलेली पावतीच आहे.म्हणूनच भारतीय जनता पार्टीचे आत्मनिर्भर भारत जिल्हा संयोजक पदाची जबाबदारी जिल्हाध्यक्ष आ.सुरेश दामू भोळे(राजुमामा) यांनी दिलेली आहे.या वेळी नियुक्ती पत्र माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते देण्यात आले त्यावेळी खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे मा आमदार स्मिताताई वाघ उपस्थित होते देशाचे लाडके पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी एक महत्वकांक्षी संकल्पना देशात सुरू केली आहे.आणि आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून देशातील प्रत्येक घटकांचे सक्षमीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या योजना दिल्या गेल्या आहेत.त्यांच्या प्रचार व प्रसाराचे कार्य जळगाव जिल्ह्यात वाढीस लागण्यासाठी ही निवड केली गेली आहे.सदर निवडीबद्दल अभिनंदन केले.....

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button