Pune

महात्मा फुलेनगर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

महात्मा फुलेनगर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

प्रतिनिधी पुणे जिल्हा दत्ता पारेकर

पुणे–राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महात्मा फुलेनगर ता इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी ,, शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रयोगांचे सादरी करणं केले हे छोटेखानी विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी महात्मा फुले विद्यलयातील विदयार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते , हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी श्री रवींद्र तनपुरे सर सौ ज्योती गायकवाड मॅडम सौ लावंड मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले ,,, कार्यक्रमाचे उद्घाटन विज्ञान विषय शिक्षक श्री झगडे सर व श्री बागल सर यांनी केले ,, महात्मा फुले विद्यलयातील श्री झगडे सर यांनी भारतीय शास्त्रज्ञ डॉ सी व्ही रमण त्यांचे कार्य आणि विज्ञान दिनाचे महत्व समजावून सांगितले . श्री अनिल गायकवाड सर यांनी प्रास्तविक माहिती सांगितली व सर्व उपस्थितांचे स्वागत केले . या प्रयोगांमध्ये हवेवर चालणारी पाण्यातील बोट ,, घरगुती साहित्याचा उपयोग करून बनवलेला एअर कुलर व पाणी शोधन यंत्र , फुफुसा चे कार्य , अंधश्रध्दा निर्मूलन वरील प्रयोग ,, सेन्सर वर कार्यरत असणारी वॉर्निंग बेल ,, अक्सीजन चे महत्व ,, वृक्षारोपण व झाडाचे उपयोग असे अनेक छोटे मोठे प्रयोगांचा समावेश होता .

महात्मा फुलेनगर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

यातून नमन सोळंकी 4 थी प्रथम , अभय चितारे 3 री द्वितीय , संबोधी बनसोडे 1ली तृतीय व नेहा वाघ 4 थी तृतीय असे नंबर काढून श्री बागल सर यांचे हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला .. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि यातूनच भारताचा भावी वैज्ञानिक निर्माण होऊ शकतो या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविला गेला .सर्व पालक वर्गाने याचे खूप खूप कौतुक केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button