Parola

अमळनेर रस्त्यावर अज्ञात इस्माकडून एकावर हल्ला 60 हजाराची लूट-गंभीर जखमी

अमळनेर रस्त्यावर अज्ञात इस्माकडून एकावर हल्ला 60 हजाराची लूट-गंभीर जखमी

पारोळा (प्रतिनिधी) कमलेश चौधरी

पारोळा-
सुभाष बुधा सोनवणे वय 30
रा.पारोळा येथील धरणगाव अर्बन ब्यांकेच्या एका पिग्मी एजंट वर दि 17 रोजी रात्री 8.20 वाजता अज्ञात व्यक्तींनी हल्ला करत 60 हजाराची लूट करत सदर एजंट ला गंभीर जखमी केले.
या बाबत मिळालेल्या माहिती नुसार सुभाष बुधा सोनवणे वय 30 हे दि 17 रोजी सायंकाळी 7 वाजे पासून डेली कलेक्शन करत होते रात्री 8.20 ला ते कलेक्शन करून घरी अमळनेर रस्त्याला बालाजी शाळे मागे असलेल्या घरी सायकलीवर परतत असताना 3 अज्ञात तरुणांनी जे दबा धरून बसले होते त्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते त्यांनी सुभाष सोनवणे यांचे वर अचानक हल्ला करत लोखंडी रॉड ने डोक्यावर जोरदार हल्ला करत त्याच्या हातातील ब्याग हिसकवत फरार झाले सदर ब्यागेत एकूण 60 ते 70 हजाराची रोकड असल्याचे सांगण्यात येत होते या बाबत त्यांना जखमी अवस्थेत काही नागरिकांनी पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता त्यांचे वर डॉ योगेश साळुंखे,डॉ सुनील पारोचे यांनी प्राथमिक उपचार करत धुळे येथे हलविण्यात आले या बाबत रात्री उशिरा पर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते माहिती मिळताच पो नि लीलाधर कानडे व पोलीस पथकाने घटना स्थळी भेट देऊन अमळनेर,पारोळा,धुळे चौफुली वर नाका बंदी करत जिल्ह्यात वायरलेस केल्या या बाबत घटनेचे वृत्त कळताच पारोळा कुटीर रुग्णालयात माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा,दत्ताजी महाजन,विनोद खाडे, रवी पाटील,मुकुंदा चौधरी, डॉ रवी निकम,यांच्यासह धरणगाव अर्बन ब्यांकेचे कर्मचारी यांनी भेट दिली,सदर हल्ल्या मुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून,पोलिसां पुढे आरोपी पडकण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे।

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button