Amalner

?️अमळनेर कट्टा…आज न प ची बैठक..!आजच्या बैठकीला पत्रकार आमंत्रित..!उशिरा सुचलेलं शहाणपण..!

?️अमळनेर कट्टा…आज न प ची बैठक..!आजच्या बैठकीला पत्रकार आमंत्रित..!उशिरा सुचलेलं शहाणपण..!

अमळनेर येथे आज शिवाजी महाराज नाट्यमन्दिर येथे नगरपरिषदेने आठवडे बाजार संबधित निर्णयासाठी बैठक आयोजित केली आहे. नेहमीच भाजी विक्रेते आणि किरकोळ व्यापारी यांच्या कडे दुर्लक्ष करणाऱ्या नगरपरिषदेला परवाच्या सोमवारी सर्व भाजी विक्रेते आणि किरकोळ व्यापारी यांनी धुडकावून लावले..आणि सोमवारचा आठवडे बाजार नियमित भरून प्रशासनाच्या बेशिस्त व्यवस्थापनाला कचऱ्याचा डबा दाखविला..

अमळनेर शहरात व तालुक्यात कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढत
असल्याने खबरदारी घेण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाय योजना करण्या बाबत मा.जिल्हाधिकारी सो जळगाव यांनी संदर्भिय-६ अन्वये आदेश निर्गमित केलेले आहेत. तसेच संदर्भीय क्रमांक-९ अन्वये मार्च महिन्या पासून दर शनिवारी बाजार बंद ठेवण्या बाबत घोषित केले होते. संदर्भिय-६ अन्वये आठवडे बाजार बंद ठेवणे बाबत आदेश म. जिल्हाधिकारी सो.यांनी पारित केलेले आहे. त्या अनुषंगाने अमळनेर येथील आठवडे बाजार हा दर सोमवारी असतो त्यावर चर्चा करून करणे
कामी दिनांक-०३/०३/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे बैठक ओयोजीत केलेली असून सदर बैठकीस उपस्थितांनी मास्क लावणे , सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग चे पालन करणे अनिवार्य राहील. तरी सर्वांनी वर नमूद केले नुसार बैठकीत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या वर्षभरात कोव्हिडं 19 च्या संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन काळात प्रशासनाने पत्रकारांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतले आणि अपेक्षा मात्र प्रसिद्धी ची केली . पत्रात जरी पत्रकारांना आमंत्रण नसले तरी संदेश देताना पत्रकारांना बोलवलं आहे..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button