Amalner

अमळनेर कट्टा….पोलखोल…छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात प्रेमालाप,चोरी बरोबरच अवैध व विकृत चाळ्यांना ऊत..! न प प्रशासनाचे दुर्लक्ष..!चोरी बरोबरच गुटखा विक्री …!

अमळनेर कट्टा…पोलखोल…छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात अवैध व विकृत चाळ्यांना ऊत..!न प प्रशासनाचे दुर्लक्ष..!चोरी बरोबरच गुटखा विक्री..!

अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे दिवस रात्र पहारेकरी असून देखील ह्या वास्तूत आता अवैध धंदे,चोरी आणि रिकामटेकड्या तरुणांचा व्हिडीओ शूटिंगचा स्पॉट असे विचित्र प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ह्या अत्यन्त पवित्र अश्या वास्तूत असे गैर प्रकार घडत असल्याचे सांगितले जात होते. याची शहानिशा करण्यासाठी स्वतः जागेवर 4 ते 5 वेळा भेट दिली असता येथे रात्री धूम्रपान करत असलेले तरुण आढळून आले. तर तीन दिवसांपूर्वी येथे विमल गुटखा विक्री केली जात असल्याचे समजले तर दोन दिवसांपूर्वी येथे उभ्या असलेल्या ट्रॅकटर ची बॅटरी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.दिवसभरात कोणते न कोणते मुले येथे बसलेले असतात.तर काही तरुण मंडळींनी इन्स्टाग्रामवर रील व्हिडीओ तयार करत आहेत.हे व्हिडीओ तयार करत असताना ह्या जागेचे पावित्र्य राखले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. येथील पाहरेकऱ्यास पैसे दिले जातात असंही कानावर आले आहे तर त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचे सांगितले आहे.येथे वाढदिवस साजरा करण्याचे प्रमाण वाढले असून हे नाट्यगृह वाढदिवस साजरा करण्याचे ठिकाण बनत चालले आहे.
नाट्यगृहातील मुख्य लोखंडी प्रवेशद्वार सतत उघडे असते तर काचेचे प्रवेशद्वाराचे कुलूप तुटलेले आढळून आले आहे. हे दार उघडून काही तरुण मंडळी नाट्यगृहाच्या आत जाऊन देखील अनुचित प्रकार करत असल्याचे दिसून आले आहे. बाहेर एक दोन जण बसतात व आत बाकी तरुण जाऊन रिकामे काम करतात असा प्रकार सध्या ह्या नाट्यगृहात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी एक तरुण तरुणी नाट्यगृहाच्या मागील बाजूस बसून प्रेमालाप करत असल्याचे दिसून आले होते.
एकूणच हा प्रकार अत्यन्त धक्कादायक असून छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाचे कलादालन म्हणून तर वेगळे स्थान आहेच पण ज्यांचे नाव ह्या नाट्यगृहाला देण्यात आले आहे. ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य आदर स्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाला काळिमा फासणारे हे प्रकार आहेत. मोठ मोठ्या गप्पा मारणाऱ्या न प प्रशासनाचे डोळे बांधले आहेत की जाणून बुजून ह्या कडे दुर्लक्ष केले जात आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबतीत तात्काळ प्रशासनाने कार्यवाही करत सदर प्रकारांना आळा घालण्यासाठी उपाय योजना कराव्यात.अशी मागणी केली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button