Amalner

?️अमळनेर कट्टा..जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अमळनेर चा आठवडे बाजार राहील उद्या बंद..! भाजी विक्रेते आणि जनतेत संभ्रमाचे वातावरण..!तर भाजी बाजार उद्या बंद ठेवणार नाही ..!भाजी विक्रेत्यांची प्रतिक्रिया…!

?️अमळनेर कट्टा..जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अमळनेर चा आठवडे बाजार राहील उद्या बंद..! जनतेत गोंधळ…!

अमळनेर येथे उद्या सोमवारचा आठवडा बाजार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार बंद राहणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी दिली आहे.शनिवारी व सोमवार बंदच्या बाबतीत पुन्हा निर्णय घेण्यात येणार असे ठोस प्रहारशी बोलताना सांगितले तसेच नगरपरिषदेने भाजी विक्रेत्यांना विश्वासात घेतले नाही त्यामुळे सादर प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच चर्चा करून मार्गी लावण्यात येणार आहे शनिवार चा बंद हा ऐच्छिक असून प्रशासन कोणालाही बंद करण्यास भाग पाडणार नाही.असे ही त्यांनी सांगितले आहे.

या संदर्भात सविस्तर वृत्त असे की जळगांव जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉक डाऊन ची परिस्थिती निर्माण होऊ नये या अनुषंगाने टप्या टप्याने पुन्हा शहरात गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातील व्यापारी वर्गाची बैठक घेऊन मार्च महिन्या पासून दर शनिवारी उस्फुर्त बंद चा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु सदर बैठकीला भाजी पाला विक्रेत्यांना बोलावण्यात आले नव्हते.परिणामी त्यांनी सदर गोष्टीला विरोध दर्शविला असून बंद चा वार बदलवा असा आग्रह धरला आहे.

याबाबतीत भाजी विक्रेते मंगेश महाजन,गंगाराम निंबा महाजन यांच्या शी बोलणे केले असता उद्या बंद ठेवणार नसून पुढच्या सोमवार पासून बाजार बंद ठेवण्यात येईल.कारण आता कोणत्याही विक्रेत्यांना ही गोष्ट माहीत नव्हती आणि भाजी पाला खरेदी केला आहे. तो वाया जाईल आणि शेतकऱ्यांचे व किरकोळ विक्रेत्यांचे नुकसान होईल असे सांगितले आहे.तसेच उद्या बंद पाळणार नाही अशी माहिती प्रकाश भास्कर महाजन, अनिल मधुकर महाजन ,मंगेश अशोक महाजन, चंद्रकांत सिताराम महाजन, राहुल भगवान महाजन, भारत प्रकाश महाजन यांनी दिली आहे.

यातून प्रशासन आणि भाजी विक्रेते यांच्यातील विसंवाद लक्षात आला असून प्रशासनाने आधी ही गोष्ट जाहीर करणे आवश्यक होते. कारण भाजी,फळे इ नाशवंत असतात व खराब होतात. कोरोना काळात प्रशासनाने नेहमीच भाजी आणि फळ विक्रेते यांना दुजा भावाची वागणूक दिली असून सर्वात जास्त त्रास किरकोळ भाजी विक्रेत्यांना प्रशासनाने दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button